शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या ओळखीने घात केला! बीडच्या महिलेचा छत्रपती संभाजीनगरात खून, तीन महिन्यांनी उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:11 IST

पांढऱ्या मण्यांची माळ अन् अंगठीने तपासाला सुरुवात, वेरूळ घाटात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची झाली उकल, आरोपी अटकेत

खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर): वेरूळ घाटात सापडलेल्या अनोळखी महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलले असून, तीचा खून झाल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपींना अटक करून प्रकरणाची उकल केली आहे. तीन महिन्यांपूर्वी वेरूळ घाटात महिलेच्या कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहावरील पांढऱ्या मण्यांची माळ अन् तीन धातूंच्या अंगठीने तपासाला सुरुवात करून पोलिसांनी बीड येथील महिलेची छत्रपती संभाजीनगरातील दोघांनी हत्या केल्याचे क्लिष्ट तपासातून उघड केले. 

वेरूळ घाटातील वळणाजवळ दरीत १० नोव्हेंबर २०२४ रोजी एका स्त्रीचा कुजलेला मृतदेह सापडला होता. मृतदेह पूर्णतः कुजल्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. घटनास्थळी सापडलेल्या पांढऱ्या मण्यांच्या माळेसह हातात असलेल्या तीन धातूच्या अंगठ्या यावरून तपासाला सुरुवात करण्यात आली. शवविच्छेदनादरम्यान मृतदेहाच्या हाडाचा नमुना डीएनए तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला होता.  

दरम्यान, जवळपास एक महिन्याने ४ डिसेंबर २०२४ रोजी बीड शहरातील शांताबाई भारत धामुने (वय ६५ वर्षे) या ३ ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याची नोंद पोलीस ठाणे पेठ, बीड येथे असल्याची माहिती मिळाली. खुलताबाद पोलिसांनी मृतदेहाजवळ सापडलेल्या अंगठ्या आणि माळ तिच्या कुटुंबीयांना दाखवल्या. तिची मुलगी रत्नमाला शशिकांत सुते हिने अंगठ्या आणि माळ तिच्या आईची असल्याचा संशय व्यक्त केला.  डीएनए नमुन्याद्वारे मृतदेह हा शांताबाई धामुने यांचा असल्याचे २३ जानेवारी २०२५ रोजी प्राप्त झालेल्या अहवालातून निष्पन्न झाले.  

जुन्या ओळखीने घात केलाशांताबाई धामुने यांच्या फोन कॉलची तपासणी केली असता ३ ऑक्टोबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव परिसरातील जावेद खान नुर खान याच्याशी वारंवार संपर्क झाल्याचे निष्पन्न झाले. त्या रात्री ९:३० वाजता पडेगाव येथे पोहोचल्या होत्या आणि त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या. संशयावरून पोलिसांनी जावेद खानला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, जावेद खानने सांगितले की, तो पडेगाव येथे प्लॉट खरेदी-विक्री एजंट म्हणून काम करतो. शांताबाई धामुने यांची त्याच्याशी ओळख होती. त्या प्लॉट खरेदीसाठी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी त्याच्याकडे रोख रक्कम घेऊन आल्या होत्या. पैशाच्या लालसेने त्याने त्याच्या सावत्र भावासह त्यांना गुंगीचे औषध दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी ४ ऑक्टोबर रोजी वेरूळ घाटात नेऊन धारदार शस्त्राने गळा कापून त्यांचा खून केला आणि मृतदेह दरीत फेकून दिला.

पोलिसांच्या सातत्यपूर्ण तपासाला यशया प्रकरणी जावेद खान नुर खान आणि नदीम खान नुर खान या दोघांना २७ जानेवारी २०२५ रोजी रात्री अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सुमारे तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेत सुरुवातीला एक महिना तर ओळख उघडकीस होण्यासच लागले. त्यानंतरही पोलिसांनी तपासात सातत्य ठेवत आरोपींना अटक केली. पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, सपोनि दिनकर गोरे, नवनाथ कोल्हे, योगेश्वर ताठे, किशोर गवळी, जाकेर शेख, सिद्धार्थ सदावर्ते, सोनाली कुंदे यांनी तपास यशस्वीपणे पूर्ण केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर