शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीला भेटून घरी परताना इंजिनिअर तरुणाचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 12:00 IST

जालना रोडवर दोन दुचाकीच्या धडकेत इंजिनिअर तरूणाचा जागीच मृत्यू झाला 

करमाड : जालना रोडवरील एका हॉटेलजवळ रविवारी रात्री ८ वाजता दोन दुचाकीच्या धडकेत अभियंता तरुण जागीच ठार झाला. आकाश बापूराव शिंदे ( 23, रा दुधनवाडी ता. बदनापूर जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथील बहिणीला भेटून आकाश शिंदे रविवारी रात्री गावाकडे परतत होता. जालना रोडवरील एका हॉटेलजवळ त्याच्या दुचाकीचा अन्य दुचाकीसोबत अपघात झाला. रस्त्यावर पडल्याने आकाशच्या डोक्याला जबर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून आकाशला मृत घोषित केले. 

दोन महिन्यानंतर होणार होते लग्न आकाशला दोन मोठ्या बहिणी होत्या. तो पुणे येथे इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता. मात्र, त्याला दोन महिन्यांपूर्वी हृदयरोगाचा त्रास झाला. त्यामुळे आरामासाठी सध्या मूळगाव दुधनवाडी ( बदनापूर) येथे तो आला होता. दरम्यान,  आकाशचे लग्न ठरले होते. दोन महिन्यानंतर लग्नाची तारीख काढण्यात आली होती. मात्र अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू