शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर कार लावून बेजबाबदारपणे उघडला दरवाजा, दुचाकीस्वार वृद्धाचा धडकून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 14:57 IST

भररस्त्यावरच चारचाकी, हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा होऊन अपघाताला निमंत्रण

छत्रपती संभाजीनगर : सावरकर चौकात एका बेजबाबदार कारचालकाने मागचापुढचा विचार न करता थेट कारचा दरवाजा उघडल्याने दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा अपघातात मृत्यू झाला. ६८ वर्षीय अशोक लक्ष्मीनारायण अमृते हे या अपघातात गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना २१ मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

अशोक पत्नीसमवेत नवजीवन कॉलनीत राहत होते. १९ मे रोजी दुपारी १२:३० वाजता ते आपल्या मित्रासह समर्थनगर भागातील बँकेत गेले होते. काम आटोपून वरद गणेश मंदिराकडून सावरकर चौकाच्या दिशेने जात असताना चौकाच्या अलीकडे एका कारचालकाने (एमएच २० - सीएच - ३४२३) खबरदारी न घेता रस्त्यावरच उभ्या केलेल्या कारचा दरवाजा अचानक उघडला. दरवाजा अचानक उघडल्याने मागून येत असलेल्या अशोक यांची दुचाकी थेट दरवाजावर जाऊन आदळली. या धडकेत ते रस्त्यावर कोसळून डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.

घाटीत मृत्यूशी झुंज अपयशीअपघातानंतर कारचालक व स्थानिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान २१ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. अशोक अमृते हे बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांची मुलगी परदेशात राहते. या घटनेनंतर अशोक यांचे पुतणे प्राध्यापक मनिष अमृते यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपास अधिकारी उपनिरीक्षक रमेश कंदे यांनी तपास करून चालक भोवनेश्वर रामदास पाटील (रा. बजाजनगर) हे असल्याचे निष्पन्न केले.

रस्त्यावरच पार्किंगचा विळखासमर्थनगरमध्ये भररस्त्यावरच चारचाकी, हातगाड्या उभ्या केल्या जातात. वरद गणेश मंदिर ते सावरकर चौक रस्त्यावरील मोठ्या प्रमाणावर बँक, शॉपिंग कॉम्प्लेक्स, हॉटेल, मेडिकल आहेत. मात्र, अनेक ठिकाणी गाड्यांसाठी जागा नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावर गाड्या उभ्या करतात. यामुळे अनेकदा वाहतूक खोळंबते. शिवाय, अपघातदेखील होत आहे. मात्र, मनपा, वाहतूक पोलिस याकडे साफ दुर्लक्ष करते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात