शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टुडंट व्हिसा’वर आलेल्या सुदानच्या तरुणाकडून अल्पवयीनांच्या धर्मांतराचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 12:57 IST

‘स्टुडंट व्हिसा’वर भारतात प्रवेश, महाविद्यालयात मात्र एक दिवसही उपस्थिती नाही

छत्रपती संभाजीनगर : दोन अल्पवयीन मुलांना घरात बोलावून विदेशी तरुणाने त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितलेल्या ओळी म्हटल्या नाहीत म्हणून त्याने मुलांना वायरने मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक कुटुंबांनी केला. गुरुवारी रात्री हडकोत हा प्रकार निदर्शनास येताच पोलिस विभाग, एटीएससह, तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. गुरुवारी मध्यरात्रीतून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ओसामा अली युसूफ अहमद (२२, रा. सुदान, दक्षिण आफ्रिका) याला अटक करण्यात आली.

दहावीत शिकणारा १५ वर्षीय कुशल व त्याचा मित्र महेश (दोघांची नावे बदललेली आहेत) हे दोघे गुरुवारी रात्री ९ वाजता परिसरात फिरत होते. काही अंतरावर एका घराच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या तरुणाने त्यांना घरात बोलावले. त्याला काही मदत असेल, असे वाटल्याने दोघेही त्याच्याकडे गेले. ओसामाने मात्र दरवाजा लावून दोघांना खाली बसवले. एका पुस्तकाचे मोठ्याने वाचन केले. नंतर पुटपुटत कागदावर मजकूर लिहिला. तो कागद जाळून हाताने तो धूर दोघांना देऊ लागला. रोहन, महेश दोघांनी त्याला जाब विचारला. त्यावर त्याने ‘मी म्हणेल तसे म्हणा’, असे धमकावले. मुलांनी नकार दिला. त्याचा राग आल्याने ओसामाने चार्जर त्यांच्यावर उगारले. त्यामुळे घाबरलेल्या दोघांनी तेथून धूम ठोकत घर गाठून हा प्रकार सांगितला.

तपास यंत्रणांची धावाधावघाबरलेल्या कुटुंबीयांनी तत्काळ ११२ क्रमांकावर मदत मागितली. उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त धनंजय पाटील, संपत शिंदे, निरीक्षक संदीप गुरमे, निर्मला परदेशी, सहायक निरीक्षक शिवाजी चौरे, काशीनाथ महांडुळे यांनी धाव घेतली. सिटी चौक, गुन्हे शाखेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. पहाटे ओसामाला ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळी एटीएस, अन्य गुप्तचर यंत्रणांनी याची दखल घेतली. ओसामाच्या काही मित्रांनाही ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले. सायंकाळी ५ वाजता सहायक निरीक्षक शिवाजी चौरे यांनी त्याला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील ॲड. रवींद्र अवसरमोल यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने त्याला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली,

महाविद्यालयात गेल्याची नोंदच नाहीओसामा ८ ऑक्टोबर, २०२२ रोजी शिक्षणासाठी (स्टुडंट व्हिसा) भारतात आला. मौलाना आझाद महाविद्यालयात बी. कॉम.साठी प्रवेश घेतला. पोलिसांनी महाविद्यालयाशी संपर्क साधला. तेव्हा दुसऱ्या वर्षात शिकणारा ओसामा एकाही वेळा महाविद्यालयात गेल्याची नोंदच नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. पोलिसांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांना त्याच्या घरात २ बंद मोबाइल व धार्मिक साहित्य आढळून आले. पोलिसांनी त्याचे कॉल डिटेल्स, इंटरनेटचा वापर, बँकेची माहिती मागवून तपास सुरू केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद