शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

एन्काउंटरमध्ये अमोलनेच पहिली गोळी झाडली; त्यावेळी गाडीत असलेल्या खुशीचा जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 13:06 IST

अमोलच्या मैत्रिणीचा न्यायालयात जबाब : तिच्याकडूनच उलगडणार सोन्याचे गूढ ?

छत्रपती संभाजीनगर : एन्काउंटरनंतर कलम १६४ अंतर्गत एन्काउंटरमधील महत्त्वाच्या साक्षीदारांचे न्यायालयात जबाब नोंदवले गेले. त्या जबाबात बजाजनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकर याची मैत्रीण हाफिजा ऊर्फ खुशी अख्तर अली शेख (२७, मूळ रा. पश्चिम बंगाल) हिने अमोलनेच पहिली गोळी झाडल्याचा जबाब दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तिचा हा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. खुशीसह अमोलच्या जवळच्या एका व्यक्तीच्या चौकशीवर आता लुटलेल्या सोन्याच्या तपासाची मदार अवलंबून आहे. त्यासाठी पोलिसांनी खुशीचा ताबा मिळण्यासाठी सीआयडीला त्यासाठी पत्र पाठवल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

कंपनीतील सततचा अपमान व उद्योजक लड्डा यांच्याविषयी ईर्षेतून त्यांचाच बालमित्र बालासाहेब इंगोले (४६, रा. वाळूज महानगर) याने दरोड्याचा कट रचला होता. यासाठी त्याने अमोल, योगेश हाजबेव्यतिरिक्त देवीदास शिंदे, महेश गोराडे, गणेश गोराडे, आजिनाथ जाधव यांच्यासोबत समांतर दुसरा कट रचला होता. मात्र, अमोल व हाजबेने लड्डा यांची इत्यंभूत माहिती घेत त्यांनाच बाजूला सारत दरोडा टाकून लुटमार केली. गुरुवारी पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या पथकाने इंगोले, गोराडे बंधू, शिंदे व जाधव यांना न्यायालयात हजर केले. त्यांची चौकशी पूर्ण झाल्याचे पोलिसांनी सांगितल्याने न्यायालयाने त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी केली.

सराफाला पोलिस कोठडीगुन्हे शाखेने गुरुवारी अंबाजोगाईचा सुरेश गंगणेचे सोने विकण्यास मदत करणाऱ्या शेख अबुजर ऊर्फ शाहिद, शेख सोहेल शेख मुस्तफा (दोघे रा. अंबाजोगाई), शेख शाहरुख शेख रफिक (नांदेड) व सराफा व्यावसायिक आशिष जयकुमार बाकलीवाल यांना अटक केली. शुक्रवारी न्यायालयाने त्यांना ९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गंगणेने दरोड्यातील हिरे, चांदीची भांडी तेलंगणा, आंध्रात विकल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

१६ मेला अमोल दोन तास घरातखुशीचा ताबा सध्या सीआयडीकडे असून, तिला महिला राजगृहात ठेवण्यात आले आहे. १५ मे रोजी दरोड्यानंतर १६ मे रोजी अमोल तिच्यासह पडेगावच्या घरी गेला होता. जवळपास २ तास घरात थांबून, दोघेही २५ मेपर्यंत विविध राज्यांत फिरून शहरात परतले होते. यादरम्यान खुशीकडे सोन्याविषयी माहिती असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्यामुळे तिची चौकशी महत्त्वाची असल्याने तिचा ताबा देण्यासाठी पोलिसांनी सीआयडीला पत्र लिहिले आहे. तिच्यासह अमोलच्या आणखी एका जवळच्या व्यक्तीची चौकशी केली जाणार आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी