अमिताभच्या सहवासाने बच्चेकंपनी खुश
By Admin | Updated: August 1, 2014 00:24 IST2014-07-31T23:41:02+5:302014-08-01T00:24:34+5:30
परभणी : हॉटसीटवर बसून करोडपती होण्याचे स्वप्न दाखविणारा अमिताभ... कजरा रे च्या गाण्यावर थिरकविणारा अमिताभ.... आणि धीरगंभीर संवादफेक करुन प्रेक्षकांना गंभीर करणारा अमिताभ...
अमिताभच्या सहवासाने बच्चेकंपनी खुश
परभणी : हॉटसीटवर बसून करोडपती होण्याचे स्वप्न दाखविणारा अमिताभ... कजरा रे च्या गाण्यावर थिरकविणारा अमिताभ.... आणि धीरगंभीर संवादफेक करुन प्रेक्षकांना गंभीर करणारा अमिताभ... हाच अमिताभ अगदी जवळ, आपल्यासमोरच आला तर... असाच अमिताभचा हुबेहूब ज्युनियर अमिताभ बाल मंच सदस्यांच्या भेटीला आला आणि बच्चे कंपनींनी धम्माल मस्ती केली.
लोकमत बाल विकास मंचच्या वतीने अमिताभ बच्चन (ज्युनिअर) यांचा कार्यक्रम खास बच्चे कंपनीसाठी आयोजित केला होता. बुधवारी शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन या अमिताभ बच्चने मुलांचे मनोरंजन आणि प्रबोधनही केले. कौन बनेगा करोडपतीमधील हॉट सीटवर बसून त्यांनी संवादफेक केली. मुलांसमवेत नृत्यही केले आणि गाजलेले डायलॉगही म्हणून दाखविले. वैभवनगर येथील बाल विद्या मंदिर, नानलपेठ बाल विद्या मंदिर, आकाश कन्या, अक्षर नंदन मराठी शाळा, संस्कृती विद्या निकेतन आदी शाळांमध्ये हे कार्यक्रम झाले़ कार्यक्रमासाठी बाल विद्या मंदिरचे ए़यु कुलकर्णी, मुळे, शामा मुधळवाडकर तसेच सरोज देसरडा, शुभांगी मॅडम, ठाकरे मॅडम यांचे सहकार्य लाभले़ यासारखे उपक्रम बाल विकास मंचच्या वतीने घेतले जाणार आहेत़ (प्रतिनिधी)