व्यासपीठावर जणू अमिताभच अवतरला
By Admin | Updated: July 31, 2014 01:23 IST2014-07-31T00:50:17+5:302014-07-31T01:23:14+5:30
हिंगोली : मंगळवारी शहरातील केमिस्ट भवन येथे लोकमत बालविकास मंचच्या सदस्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ‘ज्यु. अमिताभ बच्चन’ची एन्ट्री झाली
व्यासपीठावर जणू अमिताभच अवतरला
हिंगोली : मंगळवारी शहरातील केमिस्ट भवन येथे लोकमत बालविकास मंचच्या सदस्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ‘ज्यु. अमिताभ बच्चन’ची एन्ट्री झाली अन् जणू अमिताभच अवतरल्याचा आनंद बालकांच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला. ज्यु.अमिताभनेही या संपूर्ण कार्यक्रमात बालकांचे भरपूर मनोरंजन केले.
‘लोकमत’ बालविकास मंचच्या पहिल्या वर्षाची यशस्वी सांगता करताना या कार्यक्रमाद्वारे नवीन वर्षात पदार्पनाची चाहूल दिली. ‘ज्यु.अमिताभ बच्चन’ ने बालकांसोबत हितगुज साधत विविध डायलॉग सादर केले. केबीसी गेम खेळताना नक्कल एवढी हुबेहुब होती की, जणू खरोखरच हॉटसिटवर बसलो आणि अमिताभच क्वश्चन लॉक किया जाए असे म्हणताहेत, असे वाटत होते. यातील विविध प्रश्नांद्वारे मुलांना त्यांनी विचार करण्यास भाग पाडले. या रंगलेल्या केबीसी प्रश्नमंजुषेत बालकांनी बक्षिसेही जिंकली. मुलांना स्टेजवर बोलावून त्यांच्यासोबत नृत्यही केले.
यादरम्यान लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूलच्या नेहा शिंदे, अनिषा जावळे, मनीषा खेळबाडे, विशाखा मोरे, अंजली मोरे, श्रेया इंगळे, अनुराधा साखरकर, शुभांगी धुळे, बिपस्ना जाधव, ओंकार शिंदे आदींनी ‘रंग दे बसंती’, फ्युजन लावणी, सोलो डॉन्स सादर केले. तसेच आर.के. किड्स कॅम्प इंग्लिश स्कूलच्या परम इंगोले, जान्हवी साखरकर, मयुर वैद्य, उदय जाधव, मयुर करेवार, पंकज पलंगे, कृष्णकांत जगताप, समीक्षा करजतकर, वैष्णवी गोरे, आरती घुगे, कोमल शिंदे, ज्ञानेश्वर वाबळे, गणेशा गोरे, श्रद्धा धुळे, अश्विनी ढाले, श्रद्धा वसू, एकता विनकरे यांनी हुंडा नको, वाजले की बारा, घागरा आदींवर नृत्य करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमास अनंत पत्की, अजय घुगे, दीपाली सरगर, जेजेराव बदने, रमीता पाईकराव, वैशाली भुक्तर, वैशाली कपाळे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)