‘इलेक्ट्रॉनिक’ काट्यांमुळे ‘मापात पाप’ बंद !

By Admin | Updated: May 27, 2015 00:41 IST2015-05-27T00:17:29+5:302015-05-27T00:41:46+5:30

बीड: शेतकऱ्यांकडून वजन काट्याबाबत तक्रारी वाढल्या होत्या, त्यामुळे शासनाने सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ‘इलेक्ट्रॉनिक’ वजन काटे बसविण्याच्या आदेश दिले होते,

'Amit sin' due to 'electronic' bites! | ‘इलेक्ट्रॉनिक’ काट्यांमुळे ‘मापात पाप’ बंद !

‘इलेक्ट्रॉनिक’ काट्यांमुळे ‘मापात पाप’ बंद !


बीड: शेतकऱ्यांकडून वजन काट्याबाबत तक्रारी वाढल्या होत्या, त्यामुळे शासनाने सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना ‘इलेक्ट्रॉनिक’ वजन काटे बसविण्याच्या आदेश दिले होते, याची १०० टक्के अंमलबावणी करणारी बीडची कृउबा आघाडीवर आहे.
शेतकरी आडतीमध्ये चांगला भाव व चांगले वजन करून मिळते म्हणून मोठ्या विश्वासाने आपले धान्य विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र बाजार समितीतील काही आडत दुकानदार मापात पाप करून शेतकऱ्यांच्या धान्याचे कमी वजन दाखवून धान्य हडप करण्याचा प्रयत्न करीत होते. यामुळे शेतकऱ्यांनी आडत दुकानदारांबाबत तक्रारी केल्या होत्या. शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी आणि आडत दुकानदारांची मनमानी यामुळे शासनाने जून २०१३ साली प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत दुकानात ‘इलेक्ट्रॉनिक’ वजन काटे बसविण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे मराठवाड्यातील प्रत्येक बाजार समितीत हे वजन काटे बसविण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आजही काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक’ या वजन काट्यांची पुर्णपणे अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. परंतू, बीड बाजार समिती याला अपवाद आहे. येथे १०० टक्के वजन काट्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान तर व्यक्त होतच शिवाय बाजार समित्यांबद्दल विश्वास कायम राहिला आहे.
‘वॉच’ ठेवण्यासाठी स्पेशल टिम
या काट्यांची खरच अंमलबजावणी होते का? कोठे काही गैरप्रकार निदर्शनास येतो का? शेतकऱ्यांच्या वजन काट्यांबद्दल काही अडचणी आहेत का? हे पाहण्यासाठी स्पेशल टिम नेमलेली आहे. यामध्ये एस.ए.रसाळ, डी.एस.वाघ, एच.एस.पठाण, शेख कलीम या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Amit sin' due to 'electronic' bites!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.