रामेश्वरच्या गळीत हंगामास अमित शहा लावणार हजेरी

By Admin | Updated: November 13, 2014 00:52 IST2014-11-13T00:30:30+5:302014-11-13T00:52:04+5:30

भोकरदन : रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तेराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता करण्यात येणार आहे.

Amit Shah will do the rumor of Rameshwar Rice | रामेश्वरच्या गळीत हंगामास अमित शहा लावणार हजेरी

रामेश्वरच्या गळीत हंगामास अमित शहा लावणार हजेरी


भोकरदन : रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तेराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता करण्यात येणार आहे.
सिपोरा बाजार येथील रामेश्वर साखर कारखान्यावर होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री तथा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब दानवे हे राहणार आहेत. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे-मुंडे, आ. संभाजी निलंगेकर, आ. बबनराव लोणीकर, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. आर.टी. देशमुख, आ. सुधाकर भालेराव, आ. नारायण कुचे, आ. संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार, आ. भीमराव धोंडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उसाची मोळी गव्हाणीत टाकून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भोकरदनचे आमदार तथा रामेश्वर कारखान्याचे अध्यक्ष संतोष दानवे, व्हाईस चेअरमन विजयसिंह परिहार, कार्यकारी संचालक बी.एन. साळुंके व संचालक मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Amit Shah will do the rumor of Rameshwar Rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.