आमदार अमित देशमुख यांच्या मध्यस्थीने तोडगा...
By Admin | Updated: September 3, 2016 00:29 IST2016-09-03T00:18:29+5:302016-09-03T00:29:56+5:30
लातूर : शेतमाल खरेदीच्या पैशाच्या मुदतीवरुन लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडते आणि खरेदीदारांत निर्माण झालेला तिढा अखेर आठवड्यानंतर सुटला आहे़

आमदार अमित देशमुख यांच्या मध्यस्थीने तोडगा...
लातूर : शेतमाल खरेदीच्या पैशाच्या मुदतीवरुन लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडते आणि खरेदीदारांत निर्माण झालेला तिढा अखेर आठवड्यानंतर सुटला आहे़ त्यामुळे शनिवारपासून बाजार समिती पुर्ववत सुरु होणार आहे़ ऐन सणात निर्माण झालेला पेच संपुष्टात आल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे़
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदी- विक्री झालेल्या शेतमालाचे पैसे लवकर देण्याच्या कारणावरुन आडते आणि खरेदीदारांत तिढा निर्माण झाला होता़ त्यामुळे २३ आॅगस्टपासून आडत बाजार बंद होता़ बाजार समितीने शेतमालाचा सौदा व्हावा म्हणून झेंडाही फिरविला़ परंतु, खरेदीदारांनी पाठ फिरविली होती़ दरम्यान, शुक्रवारच्या बैठकीत तिढा सुटला असून, शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन येण्याचे आवाहन सभापती ललितभाई शहा, सचिव गुंजकर यांनी केले आहे.
आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सायंकाळी आडते आणि खरेदीदारांची पुन्हा बाभळगाव येथे बैठक झाली़ तेव्हा आडत्यांनी एक पाऊल मागे घेत नवव्या दिवशी शेतमालाचे पैसे घेण्याचे मान्य केले़ त्यास खरेदीदारांनीही पाठिंबा दर्शविला़