अमित देशमुख म्हणाले, मी काँग्रेसचा आमदार..!
By Admin | Updated: July 15, 2014 00:52 IST2014-07-14T23:44:15+5:302014-07-15T00:52:07+5:30
लातूर : अमित देशमुख यांनी सोमवारी दुपारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसोबत चहापानासाठी बैठक झाली.
अमित देशमुख म्हणाले, मी काँग्रेसचा आमदार..!
लातूर : अमित देशमुख यांनी सोमवारी दुपारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसोबत चहापानासाठी बैठक झाली. दुपारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत मनपातील काँग्रेसच्या विरोधी सदस्यांनी थेट राज्यमंत्री अमित देशमुखांना प्रश्न विचारला की ‘तुम्ही आमदार कुणाचे..?’ त्याला उत्तर देताना त्यांनीही ‘मी काँग्रेसचा आमदार असल्याचा सवतासुभा केला. परंतु पुन्हा मी आघाडीचा मंत्री आहे, असेही सांगितले. परंतु यानंतरही दुखावलेल्या नगरसेवकांनी यावर माध्यमांकडे तीव्र नापसंती व्यक्त केली.
मनपात सत्ताधारी काँग्रेसला मुख्य विरोधक असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी आज राज्यमंत्री अमित देशमुख यांनी चहापान घेतले. या बैठकीला राष्ट्रवादीच्या सर्वच नगरसेवकांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी नगरसेवकांची गाऱ्हाणीही ऐकली. परंतु राकाँ नेते इंद्राळे यांनी तुम्ही आमदार कुणाचे हा सहज प्रश्न विचारला. या प्रश्नांवर राज्यमंत्री अमित देशमुख यांनी मी काँग्रेसचा आमदार असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून काम केले ते आघाडीचा आमदार यावा म्हणून केले.
परंतु जर आमदार मी फक्त काँग्रेसचा असल्याचे सांगत असतील तर आम्ही काँग्रेससाठी काम करायचे की नाही ? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल माकणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना विचारला. (प्रतिनिधी)
हा दुजाभाव का ? : माकणीकर
निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढले आहेत. वरपासून खालपर्यंत आमच्या दोघांच्या पक्षांची आघाडी होती. परंतु मी फक्त काँग्रेसचा आमदार असल्याचे सांगून ‘आघाडी’तील आमच्या असण्यावर अविश्वास दाखविण्याचा प्रयत्न झाला आहे. याची आम्हाला खंत वाटते अशी प्रतिक्रिया नगरसेवक राहुल माकणीकर आणि दिलीप इंद्राळे यांनी दिली.