लग्नाचे अमिष; मुलीला पळविले
By Admin | Updated: September 3, 2015 00:29 IST2015-09-03T00:24:12+5:302015-09-03T00:29:04+5:30
लातूर : शहरातील आनंद नगरातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली़ याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुध्द बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.

लग्नाचे अमिष; मुलीला पळविले
लातूर : शहरातील आनंद नगरातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली़ याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुध्द बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील आनंद नगर भागात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस बौध्द नगरातील बाबा प्रकाश सितापूरे (वय २३) याने लग्नाचे आमिष दाखवून ३ आॅगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान पळवून नेले, असे मुलीच्या भावाने गांधी चौक पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ त्यानुसार बाबा सितापूरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)