हात झटकण्याची मानसिकता बदला : अमीर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 00:08 IST2016-04-15T23:37:57+5:302016-04-16T00:08:18+5:30

अंबाजोगाई - हे माझे काम नाही, असे म्हणून हात झटकण्यापेक्षा अपनी सोच बदलो, फिर देखो क्या होता है, असा लाख मोलाचा सल्ला आज चित्रपट अभिनेते अमीर खान यांनी बीड

Ameer Khan: Aim to change his mind: Amir Khan | हात झटकण्याची मानसिकता बदला : अमीर खान

हात झटकण्याची मानसिकता बदला : अमीर खान

अविनाश मुडेगावकर,
अंबाजोगाई - हे माझे काम नाही, असे म्हणून हात झटकण्यापेक्षा अपनी सोच बदलो, फिर देखो क्या होता है, असा लाख मोलाचा सल्ला आज चित्रपट अभिनेते अमीर खान यांनी बीड जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. पाणी फाउंंडेशनच्या वतीने अमीर खान जलजागृती करणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी त्याने अंबाजोगाईत अधिकाऱ्यांची एक बैठकच घेतली. यावेळी त्याने बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत आपण सर्वांनीच पाण्याच्या विषयावर काम केले तर हे सगळे चित्र बदलून जाईल, असा आशावादही व्यक्त केला.
येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणकुमार परदेशी, सत्यमेव जयतेचे सत्यजित भटकळ, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, आ. प्रा. संगीता ठोंबरे, जिप. सीईओ नामदेव ननावरे, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार शरद झाडके उपस्थित होते. पाणी फौंडेशनच्या वतीने सध्या अंबाजोगाई तालुक्यात वीस ठिकाणी काम सुरू आहे.
यावेळी अमीर खान याने, स्वत: गांभीर्याने काम करून श्रमदानातून काम करणाऱ्यांना सत्यमेव जयतेच्या पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रोत्साहन व मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. सत्यमेव जयतेच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय आणि कार्यक्रमाला अभिनेता अमीर खान उपस्थित राहणार असल्याने गुरूवारपासून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. आजवर आपण जे काम हाती घेतले ते पार पाडले, असे सांगत तो म्हणाला, बीड जिल्ह्यातील दुष्काळाचा कलंक दूर करून समृद्धीसाठी लोकसहभाग अािण श्रमदानातून जलसिंचनाची कामे पार पाडण्याचे आपले स्वप्न आहे. यासाठी लोकसहभागाची आवश्यकता असल्याचेही त्याने आवर्जून सांगितले. यावर्षी पाणी फाऊंडेशनने सुरू केलेले हे काम पुढील पाच वर्षात महाराष्ट्रात नवीन ओळख निर्माण करणारे ठरणार आहे. या पद्धतीने प्रयत्न करून आपल्याच गावचा विकास आपल्याच माध्यमातून झाला पाहिजे. मात्र हे काम करतांना राजकारण न करता प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला द्यायलाही तो विसरला नाही.
यावर्षी पाऊस जोरदार होणार आहे. असे भाकित हवामान खाते व वेधशाळा यांच्यावतीने सुरू आहे. आता श्रमदानातून हे कामे करतांना टष्ट्वेंटी टष्ट्वेंटी सामन्याप्रमाणे आपल्याला लवकर कामे आटोपायची आहेत. पावसाळ्यापूर्वीच सिंचनाची कामे पूर्ण झाली तर पावसानंतर हा परिसर निश्चितच नंदनवन दिसल्याशिवाय राहणार नाही. यासाठी कमी दिवस राहिलेले असतांना नियोजन आराखडा तयार करून कामे करा, अडचण येईल तेथे सर्व प्रकारची मदत करण्यासाठी सत्यमेव जयतेची टीम व प्रशासकीय अधिकारी तुमच्या मदतीसाठी येतील असे सांगून बीड जिल्हा समृद्धीकडे नेण्यासाठी त्याने शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले. संचालन तहसीलदार शरद झाडके यांनी तर उपस्थितांचे आभार उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी मानले.
चौकटीत
नरेगा परिवर्तनाची नांदी
शासनाच्या वतीने ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी ‘नरेगा’ या योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामे केली जातात. या योजने अंतर्गत काम करतांना अनेक अडचणी येत असल्या तरी ही योजना ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी परिवर्तनाची नांदी ठरणारी आहे. हे काम इमानदारी, सच्चाई व मनातून केल्यास कसलीही अडचण येणार नाही. त्यासाठी नरेगाची भीती न बाळगता ही योजना प्रभावीपणे ग्रामीण भागात पोहचवा असे आवाहन आमीर खान याने केले.
अमीरला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
दुपारी एक वाजता अमीर खान याचे आगमन हेलिकॉप्टरने वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील हेलिपॅडवर झाले. तेथून तो पोलिस बंदोबस्तात वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात पोहचला. मात्र या अंतरावर ठिकठिकाणी अमीरखानला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी तळपत्या उन्हातही मोठी गर्दी केली होती. चाहत्यांची ही मोठी गर्दी रोखणे पोलिस प्रशानासमोर मोठ्या जिकीरीचे काम बनले होते. पोलिसांनी वेळीच आपला खाक्या दाखवत चाहत्यांची गर्दी हुसकावून लावली. मात्र दोन तासांचा कार्यक्रम पूर्ण होऊन तो परत जाईपर्यंत त्याचे चाहते रखरखत्या उन्हात तळपत उभेच राहिले होते.

Web Title: Ameer Khan: Aim to change his mind: Amir Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.