शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपासच्या सर्व्हिस रोडप्रकरणी पालिकेने झटकले हात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:55 IST

मनपाने बांधकाम विभागाकडे बोट दाखवून सर्व्हिस रोड विकसित करण्याप्रकरणी हात झटकले आहेत. 

ठळक मुद्देजबाबदारी घेण्यासाठी मनपा, पीडब्ल्यूडी, एनएचएआयची टोलवाटोलवीमृत्यूच्या महामार्गावर हजारो वाहनांची दिवसाकाठी वाहतूक

औरंगाबाद : बीड बायपास मृत्यूचा महामार्ग बनला असून, त्याच्या रुंदीकरणासाठी, सर्व्हिस रोडसाठी मनपा, पीडब्ल्यूडी, एनएचएआयच्या टोलवाटोलवीचा शेवट होत नसून मनपाने बांधकाम विभागाकडे बोट दाखवून सर्व्हिस रोड विकसित करण्याप्रकरणी हात झटकले आहेत. 

१० सप्टेंबर रोजी रस्ते व परिवहन समितीच्या बैठकीत बीड बायपासप्रकरणी चर्चा झाली. त्यानंतर त्याबाबत काहीही उपाययोजना झाल्या नाहीत. सध्या रुंदीकरण, सर्व्हिस रोडचे प्रकरण ठप्प पडलेले आहे. सध्या बायपासला सर्व्हिस रोड कुणी करावा, याची जबाबदारी कुणीही घेण्यास तयार नाही, त्यामुळे त्या रस्त्यावर अपघाती मृत्यूचे तांडव सुरूच आहे. हजारो वाहने दिवसाकाठी त्या रस्त्यावरून धावत असून, तो रस्ता सद्य:स्थितीत ७ पदरी करणे गरजेचे आहे. जड वाहने, ओव्हरटेक लेन, कार लेन, दुचाकी लेन तेथे असली तरच तो रस्ता सुरक्षित होईल. एनएच-२११ जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत बायपासवरून वाहनांची वर्दळ राहणार आहे. 

पालिकेचे ‘आॅफ दी रेकॉर्ड’ मत असेमहापालिकेचे आॅफ दी रेकॉर्ड मत असे आहे, सध्या बीड बायपास दोन्ही बाजूंनी प्रत्येक साडेसात मीटर दुभाजकासह आहे. दोन्ही बाजूंनी साडेसात मीटर रस्ता रुंद करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. त्यानंतर उर्वरित दोन्ही बाजूंनी शिल्लक राहिलेल्या जागेत मनपा सर्व्हिस रोड बांधू शकते. ६० मीटरचा तो पूर्ण रस्ता आहे. १८० फूट म्हणजेच सहा पदरी तो रस्ता बांधकाम विभागाने विकसित करणे गरजेचे आहे. दोन्ही बाजूंनी एकाच वेळी सहा ते सात वाहने जाऊ शकतात. सर्व्हिस रोड बनविण्यासाठी मनपाकडे सध्या निधी नाही. त्यामुळे बांधकाम विभागालाच तो रस्ता निर्माण करावा लागेल. 

वीस दिवसांपासून चर्चा नाही१० सप्टेंबर रोजी बीड बायपासवरून जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, एनएचएआय प्रकल्प संचालक, बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता, वाहतूक पोलिसांमध्ये जोरदार चर्चा झाली. तातडीने बैठक घेण्याबाबत मनपाने तयारी केली; परंतु २० दिवस झाले. आजवर त्या रस्त्याच्या प्रकरणावर काहीही निर्णय झालेला नाही. रस्ता हस्तांतरण करणे, मनपाने कार्यवाही करण्याचे प्रकरण ‘जैसे थे’ आहे. रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण काही कमी होत नाही.

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग