शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बायपासवरील अपघातमुक्तीसाठी ‘अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स’ सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 17:24 IST

या उपक्रमानंतर जागे झालेल्या प्रशासनाने रस्त्यांवरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याचे काम हाती घेतले.

ठळक मुद्देरस्त्यावरील समस्यांकडे वेधले लक्ष

औरंगाबाद : अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेणारे ‘अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स’चे सदस्य अपघातमुक्तीसाठीही रस्त्यावर उतरले आहेत. बीड बायपासवरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे नसल्याने अपघाताच्या घटना वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर सदस्यांनी रस्त्यावरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारून अपघातमुक्तीसाठी आगळावेगळा उपक्रम राबविला.

बीड बायपास रस्त्यावर गत काही दिवसांत लहान-मोठे अनेक भरपूर अपघात घडले. पांढरे पट्टे आणि रिफ्लेक्टर नसल्याने रस्त्यावरील गतिरोधक दूर अंतरावरून लक्षात येत नसत. यामुळे अपघातांच्या घटनांत वाढ होत होती. प्रशासनाने गतिरोधकांवर पांढरे पट्टे, परावर्तित पट्टी लावणे गरजेचे आहे; परंतु हे होत नसल्याचे निदर्शनास येताच २ जून रोजी ‘अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स’च्या सदस्यांनी एकत्र येऊन संग्रामनगर उड्डाणपूल चौक, आय्यप्पा मंदिर टी-पॉइंट, रेणुकामाता मंदिर कमान, देवळाई चौक, एमआयटी कॉलेज चौक, माऊलीनगर टी-पॉइंट या ठिकाणच्या रस्त्यावरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारले. सदस्यांनी हातात झाडू घेऊन रस्त्यावरील खडीही दूर केली. पांढरे पट्टे मारल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना किमान काही प्रमाणात का होईना गतिरोधक आहे, हे लक्षात येईल. अपघात टाळण्यास हातभार लागण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना  नागरिकांनी व्यक्त केली.

यासाठी जगदीश एरंडे यांची विशेष मदत झाली. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य समन्वयक संदीप कुलकर्णी, समन्वयक अ‍ॅड. अक्षय बाहेती, स्वप्नील चंदने, अभिषेक कादी, हर्षल पाटील, विनोद रुकर, रितेश जैन, किरण शर्मा, मीना परळकर, मनोज जैन, भूषण कोळी, अमोल कुलकर्णी, मोहित धानुका, राहुल जोशी, कृष्णा तुंगे, सत्यजित वर्मा, अमोल पाटील, हर्षल भराड, स्मिता नगरकर, स्मिता जोशी, मंजू खंडेलवाल, शिवांगी कुलकर्णी, जयश्री बेद्रे, नंदकुमार कुलकर्णी, शशांक चव्हाण,  स्वप्नील आल्हाड, प्रथमेश दुधगावकर आदींनी प्रयत्न केले.

प्रशासन लागले कामाला‘अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्स’च्या उपक्रमानंतर जागे झालेल्या प्रशासनाने रस्त्यांवरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्याचे काम हाती घेतले. सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावरील सुविधांकडे प्राधान्याने आणि नियमितपणे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे.

१६८ अपघातग्रस्तांना मदतअपघातग्रस्तांना मदत आणि रुग्णवाहिकेला गर्दीतून रस्ता मोकळा करून देणे, या उद्देशातून अ‍ॅम्ब्युलन्स हेल्प रायडर्सने काम सुरू केले. गेल्या काही दिवसांत १६८ अपघातग्रस्तांना मदत केली आहे. यातून अनेकांचा जीव वाचण्यास मदत झाली. 

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गAurangabadऔरंगाबाद