शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

पीएनजी पुरवठा करणारी महत्वाकांक्षी पाइपलाइन योजनाच गॅसवरच !

By विकास राऊत | Updated: November 25, 2023 19:19 IST

१ डिसेंबरची डेडलाइन हुकणार : शहरात २०७ पैकी फक्त ६० कि. मी.चे काम

छत्रपती संभाजीनगर : शहराला पाइपलाइनद्वारे गॅस मिळण्याची १ डिसेंबरची डेडलाइन हुकण्याची शक्यता आहे. शहरात ६० कि. मी.पर्यंतचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामाला अद्याप गती मिळत नसल्यामुळे गॅस पाइपलाइन सध्या तरी गॅसवरच असल्याचे दिसत आहे. शहरात डिसेंबर २०२२ पर्यंत घरोघरी पीएनजी मिळेल, असा दावा पावणेदोन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. दोन हजार कोटींचा हा पूर्ण प्रकल्प आहे. अहमदनगर घाटातील काम पूर्ण झालेले नाही. शहरात मनपाच्या दोन झोनमधील घरांमध्ये गॅस किट फिटिंग केली आहे. परंतु, त्या घरांना कनेक्शन कुठून देणार, असा प्रश्न आहे. महापालिका आणि भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशनमध्ये रस्ते खोदण्यासाठी किती रक्कम आकारायची, याचा निर्णय न झाल्यामुळे वेळेत काम होण्याबाबत साशंकता आहे.

तर स्वस्तात गॅस मिळणे अवघडबीपीसीएल कंपनी आणि मनपाच्या पाइप नॅचरल गॅससंबंधी असलेल्या वाटाघाटी फिस्कटल्या तर नागरिकांना पीएनजीचा स्वस्त गॅस मिळणारच नाही, अशी परिस्थिती आहे. शहरात पीएनजीचे (पाइप नॅचरल गॅस) जाळे अंथरण्यासाठी रस्ते खोदावे लागतील. त्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १२ हजार रुपये प्रति रनिंग मीटरप्रमाणे रक्कम देणे आवश्यक आहे. ही रक्कम सुमारे ८०० कोटींच्या घरात जाते. ८०० कोटी बीपीसीएलकडून मिळाले तरच पाइपलाइनचे काम पुढे सुरू होईल. याबाबत अद्याप वाटाघाटींसाठी बैठक झालेली नाही. परिणामी, नागरिकांना स्वस्त गॅस मिळणार नाही.

नदीपात्रातून काम सुरूअहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदामार्गे वाळूजमध्ये येणाऱ्या गॅस पाइपलाइनचे काम १ डिसेंबरपूर्वी पूर्ण करा, असे आदेश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सप्टेंबरमध्ये दिले होते. आता १ डिसेंबर आठवड्यावर आहे. गोदावरी नदीपात्रात एचडीडी मशिनच्या माध्यमातून गॅस पाइपलाइनचे काम सुरू असून, १३०० मीटर क्रॉसिंगचे काम लवकर पूर्ण करण्याचा दावा बीपीसीएल सूत्रांनी केला.

योजनेतून काय मिळणार?७ लाख घरगुती व ४ हजार व्यावसायिक गॅस कनेक्शन देण्याचा पहिला टप्पा आहे. एक हजार कनेक्शन उद्योगांना, १०० ठिकाणी गॅस पंप सुरू करण्याचे नियोजन आहे.

२५ हजार जोडण्या पहिल्या टप्प्यातबीपीसीएल २५ हजार कनेक्शन पहिल्या टप्प्यात शहरात देण्याचा दावा करत आहे. गॅस पाइपलाइन आल्यावर जोडणी घेताना ठराविक रक्कम भरून सध्याचा सिलिंडर नागरिकांना परत करावा लागेल. योजनेत शहरात २०७ पैकी झाले फक्त ६० कि. मी.चे काम झाले आहे.

तोडगा अजून निघेना...श्रीगोंदा येथून मुख्य गॅस पाइपलाइनचा व्हॉल्व्ह आहे. तेथून अहमदनगरमार्गे वाळूज ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पाइपलाइन टाकली जाईल. वाळूजपर्यंत पाइपलाइन आली तरी सात ते आठ ग्रामपंचायत हद्दींमध्ये गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाबाबत अजून पर्यायी तोडगा निघालेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका