पद्मपाणी बुद्ध विहारात आंबेडकर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:06 IST2019-04-16T23:06:17+5:302019-04-16T23:06:26+5:30
बजाजनगरातील पद्मपाणी बुद्ध विहारात रविवारी विविध कार्यक्रमांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

पद्मपाणी बुद्ध विहारात आंबेडकर जयंती साजरी
वाळूज महानगर : बजाजनगरातील पद्मपाणी बुद्ध विहारात रविवारी विविध कार्यक्रमांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
रविवारी सकाळी विहाराचे अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड व खेमराज हिंगणकर यांच्या हस्ते धम्म ध्वजारोह. करुन बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर प्रा. श्रीकिशन मोरे यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी बजाजनगरातील मुख्य मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली. सामूहिक बुद्ध वंदना घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रास्ताविक लक्ष्मण गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन विकास रामटेके यांनी केले. उद्धवराव सुगंधे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला एम.एस. ओव्हळ, विठ्ठल कांबळे, पो.नि. अनिल गायकवाड, जि.प. सदस्य श्याम बनसोडे, भारत बोरोडे, अशोक होळकर, सिद्धार्थ दिपके आदींसह बौद्ध उपासक-उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी राजेश शेंडे, रमेश मगरे, दिनकर अंभोरे, विजयानंद साळवे, अनिल कांबळे, उत्तम मोरे, एस.पी. हिवराळे, गौतम पारधे आदींनी परिश्रम घेतले.