अंबाजोगाईत काँग्रेस, राकाँत फोडाफोडीचे राजकारण !

By Admin | Updated: October 12, 2014 00:32 IST2014-10-12T00:32:15+5:302014-10-12T00:32:15+5:30

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई मतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल, तसतसे केज विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलू लागले आहेत. केजमधील अंबाजोगाई तालुका हे मतांचे मोठे पॉकेट आहे.

Ambajogai Congress, the politics of stumble! | अंबाजोगाईत काँग्रेस, राकाँत फोडाफोडीचे राजकारण !

अंबाजोगाईत काँग्रेस, राकाँत फोडाफोडीचे राजकारण !


अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
मतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल, तसतसे केज विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलू लागले आहेत. केजमधील अंबाजोगाई तालुका हे मतांचे मोठे पॉकेट आहे. यामुळे अंबाजोगाईकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. आता तर अंबानगरीत फोडाफोडीचे राजकारण रंगू लागले आहे.
केज विधानसभा मतदारसंघात अंबाजोगाई शहर हे मतांचे मुख्य पॉकेट आहे. उमेदवाराला निवडणूक जिंकण्यासाठी अंबाजोगाई शहरावर आपला वचक बसविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. अंबाजोगाई शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नंदकिशोर मुंदडा तर काँग्रेस पक्षाच्या वतीने राजकिशोर मोदी या दोघांची शहरावर मजबूत पकड आहे. अंबाजोगाई शहरावर आपले अधिराज्य टिकवण्यासाठी मोदी-मुंदडा यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या झालेल्या सभेत राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वाखाली माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम शेख नबी, माजी नगरसेवक नागनाथ जोगदंड, रविंद्र साठे, अशोक मोदी, रमेश चव्हाण, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर याला प्रतिउत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अक्षय मुंदडा यांनी राजकिशोर मोदी यांचे खंदे व अत्यंत विश्वासू समर्थक संतोष शिनगारे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. आता ते राष्ट्रवादीत मुंदडांच्या बाजूने सामील झाले आहेत तसेच काँग्रेस पक्षाचे माजी उपनगराध्यक्ष सय्यद मुर्तुजा मोमीन यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघााडीच्या प्रदेश सरचिटणीस सुनंदा टाक यांनी आडस येथे आ. पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आडस येथे भाजपामध्ये प्रवेश केला.
अंबाजोगाई शहरात प्रमुख लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यातच सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या सुरू झालेल्या या पळवापळवीमुळे राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू लागले आहेत.

Web Title: Ambajogai Congress, the politics of stumble!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.