शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपकडून आमच्या झेडपी सदस्यांना पैशांचे आमिष'; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:04 IST

"आमचे ५ सदस्य मुख्यमंत्र्यांना भेटायला निघाले होते, पण..."; अंबादास दानवेंनी उघड केला जिल्हा परिषदेचा 'इनसाईड' ड्रामा

छत्रपती संभाजीनगर: "जिल्हा परिषदेत भाजप आणि शिंदे गटाकडे स्पष्ट बहुमत असतानाही भाजपने आमच्या सदस्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या मनात सुरुवातीपासूनच पाप होते आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटाला अध्यक्षपद देऊ द्यायचे नव्हते," अशी घणाघाती टीका ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील घोडेबाजारावर बोलताना त्यांनी भाजपवर 'पैशांच्या थैल्या' वाटल्याचा गंभीर आरोपही केला.

भिवंडी नाक्यावर सदस्यांची अडवणूक?दानवे यांनी दावा केला की, भाजपचे मंत्री अतुल सावे यांचा ओएसडी भिवंडीच्या नाक्यावर ठाकरेसेनेच्या सदस्यांना अडवून त्यांना प्रलोभने दाखवत होता. "आमचे पाच सदस्य देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी अर्ध्या रस्त्यापर्यंत गेले होते, मात्र मी फोन केल्यानंतर ते परत आले. दुर्दैवाने आमचे दोन सदस्य (संजय निकम आणि ललिता सोनवणे) भाजपच्या नादी लागले, पण यासाठी मी त्यांना नाही तर भाजपच्या भ्रष्ट रणनीतीला दोष देतो," असेही दानवे म्हणाले.

रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणीनाशिकमधील भोंदू बाबा प्रकरणावरून दानवे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "एखाद्या भोंदू बाबाचे पाय धुणे हा घाणेरडा प्रकार आहे. महिलांची सुरक्षा बघणे हे आयोगाचे काम आहे, मात्र अध्यक्षच अशा कृत्यांचे समर्थन करत असतील तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा किंवा सरकारने त्यांना पदावरून हटवावे," अशी मागणी त्यांनी केली.

निसर्गाच्या चक्रात शेतकरी भरडलाजिल्ह्यात झालेल्या गारपिटीवर भाष्य करताना दानवे म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या पाचवीलाच मरण पुजलेले आहे. अतिवृष्टी आणि आता अवकाळी पाऊस यामुळे आंब्याचा मोहर आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने आता केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष मदत करणे गरजेचे आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Accused of Bribing ZP Members: Ambadas Danve's Explosive Claim

Web Summary : Ambadas Danve accuses BJP of attempting to poach ZP members despite majority. He alleges bribery and demands resignation of Rupali Chakankar over a controversy. Danve also highlights farmers' plight due to unseasonal rains, urging government assistance.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAmbadas Danweyअंबादास दानवेBJPभाजपा