गेवराई : माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या ताब्यात असलेल्या खरेदी-विक्री संघावर रविवारी आ. अमरसिंह पंडित यांनी झेंडा फडकवला. काका-पुतण्यातील दरी वाढलेली असताना अमरसिंहांनी बदामरावांना धक्का देत १७ पैकी १० जागा जिंकल्या. रविवारी १२०४ मतदारांपैकी ७८३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आ. अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील जयभवानी शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या १० उमेदवारांनी विजयाचा गुलाल लावला. संग्राम आहेर, फूलचंद बोरकर, बबन गलधर, डिगांबर येवले, प्रकाश जगताप, शहाजी मोटे, संजय निकम, सोमेश्वर गचांडे, गणेश मस्के, ताहेर पठाण यांचा समावेश आहे. बदामराव पंडित मित्र मंडळाच्या पॅनलचे गणेश बेदरे, शिवाजी मोटे, शशीकला देशमुख, कमल लोणकर, पंढरीनाथ लगड, युवराज डोंगरे, अंकुश काकडे यांनी विजयश्री खेचून आणली. दरम्यान, आ. अॅड. लक्ष्मण पवार यांनी या निवडणुकीपासून दूर राहणे पसंद केले. दोन पंडितांमध्ये रंगलेल्या सामन्यात अमरसिंह पंडित हे बदामराव पंडित यांना भारी ठरले. (वार्ताहर)
बदामरावांना अमरसिंहांचा धक्का
By admin | Updated: November 8, 2015 23:39 IST