दोनशे भाविक जाणार अमरनाथ यात्रेला

By Admin | Updated: July 2, 2017 00:37 IST2017-07-02T00:35:53+5:302017-07-02T00:37:54+5:30

जालना : अमरनाथ यात्रेसाठी जालन्यातील दोनशे भाविकांचा जत्था पाच जुलैला सचखंड एक्सप्रेसने रवाना होणार आहे.

Amarnath Yatra to 200 devotees | दोनशे भाविक जाणार अमरनाथ यात्रेला

दोनशे भाविक जाणार अमरनाथ यात्रेला

जालना : अमरनाथ यात्रेसाठी जालन्यातील दोनशे भाविकांचा जत्था पाच जुलैला सचखंड एक्सप्रेसने रवाना होणार आहे. श्री जय भोले महिमा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालनाचे अध्यक्ष कुलदीप कक्कड यांनी सांगितले, की २९ जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. येथील जय भोले मित्र मंडळातर्फे काढण्यात येणारी ही १३ वी अमरनाथ यात्रा असून, आतापर्यंत जिल्ह्यातील एक हजार भाविक यात सहभागी झाले आहेत. या वर्षी यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची नोंदणी, आरोग्य तपासणी, विमा, ओळखपत्र आदी सुविधा संस्थेतर्फे करण्यात आल्या आहेत. या भाविकांचा जत्था येथील मंमादेवी मंदिरापासून रेल्वे स्थानकापर्यंत पायी जाणार आहे. तेथे राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, भास्कर दानवे आदींच्या उपस्थितीत भाविकांचे स्वागत केले जाणार आहे. अधिकाधिक भाविकांनी उपस्थित राहावे, असे जय भोले मित्र मंडळाचे कुलदीप कक्कड, सुरेश राऊत, शरद तनपुरे, नंदकिशोर अग्रवाल, रंगनाथ वानखेडे, सुखलाल कुंकुलोळ आदींनी कळविले आहे.

Web Title: Amarnath Yatra to 200 devotees