शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरसाठी स्वतंत्र खंडपीठ स्थापनेच्या मागणीस नेहमीच पाठिंबा: सरन्यायाधीश भूषण गवई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 14:46 IST

'सर्वोच्च न्यायालय हे फक्त सरन्यायाधीशांचे नसून, ते सर्व न्यायमूर्तीचेच असते: सरन्यायाधीश भूषण गवई

छत्रपती संभाजीनगर : कोल्हापूरसाठी स्वतंत्र सर्किट खंडपीठ असावे, ही मागणी जेव्हा जेव्हा झाली, तेव्हा मी तिला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यासाठी मी औरंगाबाद खंडपीठाचे उदाहरण नेहमी देतो. जेव्हा औरंगाबाद खंडपीठ सुरू झाले. त्यावेळी त्याच्या उपयुक्ततेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले; परंतु आज येथे दरवर्षी जेवढे खटले दाखल होतात, ते मुंबई उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांपेक्षा अधिक असल्याचे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी येथे गुरुवारी रात्री व्यक्त केले.

औरंगाबाद खंडपीठ वकील संघातर्फे आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई आणि सुविद्य पत्नी डॉ. तेजस्विनी गवई, मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अविनाश बोरूलकर व सचिव अॅड. रवींद्र गोरे यांचीही विशेष उपस्थिती होती. सरन्यायाधीश म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालय हे फक्त सरन्यायाधीशांचे नसून, ते सर्व न्यायमूर्तीचेच असते. त्यामुळे निर्णय हा एकमतानेच व्हायला हवा. एकट्याने काम करता येत नाही. घटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज व माझे वडील रामचंद्र गवई यांच्या विचारांचा वारसा आणि समता, बंधुता व सामाजिक न्याय यांची जपणूक करीत वाटचाल करण्याचा सातत्याने प्रयत्न केल्यानेच हा बहुमान मिळाला. हे सतीचे वाण असून, ते निष्ठापूर्वक पालन करण्याचा प्रयत्न मी कसोशीने करतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

न्यायाधीश निवडीत गुणवत्ता महत्त्वाचीगवई कोलेजियमबाबत म्हणाले की, 'आम्ही नेहमीच गुणवत्तेवर आधारित न्यायाधीशांची निवड करण्यावर भर दिला आहे. उमेदवाराची जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमी, हे कधीही निकष ठरत नाहीत. केवळ त्यांची पात्रता, ज्ञान व नीतिमत्ता हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.'

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालयchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर