शाळा सुरू होऊनही अद्याप पुस्तकांचे वाटप नाही
By Admin | Updated: June 28, 2014 01:15 IST2014-06-28T00:16:19+5:302014-06-28T01:15:12+5:30
माजलगाव: माजलगाव : शाळा सुरु होताच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके मिळणार या शासनाचे आदेशाला येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने हरताळ फासला आहे.

शाळा सुरू होऊनही अद्याप पुस्तकांचे वाटप नाही
माजलगाव: माजलगाव : शाळा सुरु होताच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके मिळणार या शासनाचे आदेशाला येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने हरताळ फासला आहे. शाळा सुरु होऊन आठ दिवस उलटले तरी शहरासह ग्रामीण भागातील शाळांमध्ये पुस्तके न पोहोचल्याने तसेच त्याचे वितरण न झाल्याने शाळांमध्ये अद्याप अभ्यासाला सुरुवात झालेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याचे पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप होईल असे आदेश आहेत. त्याप्रमाणे दरवर्षी शाळा सुरु होण्यापूर्वी घोषणा करण्यात येते परंतु यावर्षी पहिली ते आठवी इयत्तेच्या अभ्यासक्रमातील सर्व विषयांच्या पुस्तकांचे कधीच वाटप होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी काही विषयांची पुस्तके बाजारातून खरेदी करावी लागतात. यंदाही शाळा सुरु झाल्या त्यापूर्वी गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे काही विषयांची अर्धवट प्रमाणात पुस्तके पाठविण्यात आली.
काही शाळांना त्याचे वाटप करण्यात आले परंतु अर्धवट पुस्तके काही शाळात व काही विषयांचीच गेल्याने शाळांनीही त्याचे वाटप केले नाही.शहरासह ग्रामीण भागातील कोथरुळसह अनेक शाळांमध्ये पुस्तके वितरीत केली गेली नाहीत.
त्यामुळे आठ दिवसानंतरही शाळामध्ये अभ्यासक्रमास सुरुवात झालेली नाही अअसे चित्र दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी पालकांमधून होत आहे. (वार्ताहर)