मदत अल्प असली तरी आशेचा किरण..!
By Admin | Updated: November 29, 2015 23:15 IST2015-11-29T23:05:09+5:302015-11-29T23:15:28+5:30
जालना : शिवसेनेतर्फे दिली जाणारी मदत अल्प असली तरी शेतकऱ्यांमध्ये ती आशेचा किरण निर्माण करणारी आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलेली आहे.

मदत अल्प असली तरी आशेचा किरण..!
जालना : शिवसेनेतर्फे दिली जाणारी मदत अल्प असली तरी शेतकऱ्यांमध्ये ती आशेचा किरण निर्माण करणारी आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलेली आहे. शिवजलक्रांती योजनेच्या माध्यमातून एक वेगळे जाळे निर्माण केले आहे, अशी माहिती आ. अर्जुन खोतकर यांनी रविवारी येथे दिली.
शिवसेनेच्या वतीने आयोजित अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मदत वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले.
खोतकर म्हणाले की, एकेकाळी फळबागांमध्ये अग्रेसर असलेल्या जालना जिल्ह्यातील फळबागा आज अखेरची घटका मोजत आहेत. गेल्या तीन वर्षांत दुष्काळामुळे ५० लाख मोसंबीची झाडे जळून गेली आहेत. कधी नव्हे इतके नुकसान जिल्ह्यातील शेतीचे झाले आहे. मात्र, यावर्षी शिवसेनेच्या वतीने शिवजलक्रांती योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. या कामांमुळे जालना परिसरातील अनेक गावांत चांगला जलसाठा निर्माण झाल्याचे ते म्हणाले. शासकीय योजनेपेक्षा शिवजलक्रांती योजनेचे काम जिल्ह्यात झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच ग्रामीण भागातील बचत गटांतील महिलांना आर्थिक मदत करण्यात आली तर बऱ्याच अंशी प्रश्न सुटू शकेल, अशी अपेक्षा आ. खोतकर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास शिवसेनेचे खासदार, मंत्री, आमदार यांच्यासह जिल्ह्याचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, डॉ.हिकमतराव उढाण, माजी आ. संतोष सांबरे, संजय खोतकर, जनार्दन खोतकर, पंडित भुतेकर, संतोष मोहिते, मोहन अग्रवाल, माधवराव कदम, राम सतकर, जगन्नाथ काकडे, हरिहर शिंदे, बाला परदेश, विष्णू पाचफुले, भाऊसाहेब घुगे, आत्मानंद भक्त, निलेश गोल्डे, मुरलीधर थेटे, मुरलीधर शेजूळ, शाम कदम, उदय तनपुरे, महिला आघाडीच्या सविता किवंडे, भास्कर मगरे, गोपाल काबलिये, डॉ. सुभाष अजमेरा, अनुराग कपूर, प्रसाद बोराडे, जगन्नाथ चव्हाण, विजय हजारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)