मधुमेहासोबत हृदयविकारही दूर करा...
By Admin | Updated: April 7, 2016 00:28 IST2016-04-07T00:08:10+5:302016-04-07T00:28:36+5:30
सितम सोनवणे , लातूर बीट डायबेटीज या माध्यमातून मधुमेहाची परिणिती अनेकदा हृदयविकारात होण्याची शक्यता असते. हृदयविकाराच्या जोखीममध्येही याचा समावेश असतो.

मधुमेहासोबत हृदयविकारही दूर करा...
सितम सोनवणे , लातूर
बीट डायबेटीज या माध्यमातून मधुमेहाची परिणिती अनेकदा हृदयविकारात होण्याची शक्यता असते. हृदयविकाराच्या जोखीममध्येही याचा समावेश असतो. तसेच धूम्रपान, लठ्ठपणा हेसुद्धा या आजाराचे जोखीम फॅक्टर आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करून मधुमेहाबरोबर हृदयविकारालाही दूर करा, असे आवाहन डॉ.एस.व्ही. कुलकर्णी व डॉ. अभय कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी केले.
यावेळी डॉ. कुलकर्णी म्हणाले, हेल्थ आॅर्गनायझेशनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षाचे घोषवाक्य बीट डायबेटीज अर्थात् मधुमेहाचा मुकाबला म्हणून मधुमेह या आजारापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेण्याचा प्रयत्न ‘जागतिक आरोग्य दिवसा’च्या माध्यमातून केला जात आहे. मधुमेहाची परिणिती अनेकदा हृदयविकारामध्ये होते. त्यातून रुग्ण बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, आहार, व्यायाम यांचा विचार होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. अभय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मधुमेहाचे रुपांतर अनेकदा हृदयविकारात होण्याची शक्यता असते. मधुमेह, उच्च रक्तदाब हे सायलंट किलर म्हणून ओळखले जातात. हृदयविकाराची जोखीम त्यामध्ये येते. तसेच लठ्ठपणा, धूम्रपान या सवयींमुळे सुद्धा रुग्णांची जोखीम वाढते. त्यामुळे रुग्णांना तीन गटांत विभागले जाते. पहिला गट हा आरोग्यसंपन्न व्यक्तींचा असतो. ज्यांना कोणताही आजार किंवा व्याधी नसते, त्यांना उपचाराची गरज नसते. परंतु, आजार होऊ नये या सबबीवर शरीराची काळजी घ्यावी लागते.