उपचारासोबतच रुग्णांचा विश्वास जिंकायचाय...
By Admin | Updated: July 1, 2017 00:35 IST2017-07-01T00:33:14+5:302017-07-01T00:35:30+5:30
बीड : मागील काही वर्षांपासून रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहेत.

उपचारासोबतच रुग्णांचा विश्वास जिंकायचाय...
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील काही वर्षांपासून रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे डॉक्टरांबद्दल सर्वसामान्यांमध्ये तीव्र रोष आहे. हा रोष दूर करण्याबरोबरच रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे, असे समजून आम्ही उपचार करतो, तसेच त्यांचे मनही जिंकतो, अशा प्रतिक्रिया जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केल्या.
रुग्णालयात आल्यानंतर प्रत्येक रुग्णाला चांगल्या उपचाराची अपेक्षा असते. तसेच आरोग्य सेवा देण्याचा डॉक्टरांचाही मानस असतो; परंतु मागील काही वर्षांपासून डॉक्टरांवरील हल्ले, डॉक्टर-रुग्णांमधील वाद, वेळेवर आरोग्य सेवा न मिळणे या कारणांमुळे डॉक्टरांबद्दल सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते. ही नाराजी दूर करण्यासाठी डॉक्टरांनी रूग्णांसोबत संवाद वाढविण्याची गरज आहे. पिढी बदलल्यामुळे सुसंवादाची दरी बहुतांश ठिकाणी वाढल्याचे पहावयास मिळते. डॉक्टर आणि रुग्ण व त्याचे नातेवाईक यांच्यातील सुसंवादासाठी दोन्ही बाजूने संयम महत्त्वाचा असल्याबाबत सूर उमटला.