उन्हाळी मिरची लागवडीची शेतकऱ्यांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:05 IST2021-04-27T04:05:11+5:302021-04-27T04:05:11+5:30
भराडी : परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील विहिरीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरची लागवडीसाठी कंबर कसली आहे. सध्या ...

उन्हाळी मिरची लागवडीची शेतकऱ्यांची लगबग
भराडी : परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील विहिरीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरची लागवडीसाठी कंबर कसली आहे. सध्या मिरची लावण्यासाठी शेतकरी व्यस्त झाला आहे. दरवर्षी मिरचीतून मिळत असलेल्या उत्पन्नात वाढ झाल्याने शेतकरीवर्ग उन्हाळी मिरची लागवडीकडे वळला आहे.
सध्या परिसरातील वडाळा, बोजगाव, वडोद चाथा, भराडी, वांगी बु, वांगी खुर्द, पिरोळा, डोईफोडा, सिसारखेडा, कासोद, दिडगाव, उपळी, मांडगाव तळणी, धानोरा या भागात शेतकरी मान्सूनपूर्व मिरची लागवड करण्यासाठी सरसावले आहेत. शेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करू लागला आहे.
मल्चिंग पेपरच्या मदतीने शेतकरी बांधवांसाठी एक उत्तम पर्याय ठरू लागला आहे. मल्चिंग पेपरच्या वापरामुळे तणांची वाढ होत नाही. खर्चदेखील कमी होत आहे. दर्जेदार उत्पादन मिळते. यामुळे मिरचीला चांगला भाव मिळतो.