शिक्षकांना उन्हाळी सुटीत तरी मुख्यालय सोडण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:04 IST2021-05-13T04:04:41+5:302021-05-13T04:04:41+5:30

प्रशासनाच्या आदेशाला ''ओ'' देणाऱ्या शिक्षकांना गेल्या दोन वर्षापासून ग्रामीण व शहरी भागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा कोविडसाठी ...

Allow teachers to leave headquarters even during summer vacations | शिक्षकांना उन्हाळी सुटीत तरी मुख्यालय सोडण्याची परवानगी द्या

शिक्षकांना उन्हाळी सुटीत तरी मुख्यालय सोडण्याची परवानगी द्या

प्रशासनाच्या आदेशाला ''ओ'' देणाऱ्या शिक्षकांना गेल्या दोन वर्षापासून ग्रामीण व शहरी भागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा कोविडसाठी जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. त्यांना विविध विलगीकरण कक्ष, पोलीस मित्र, ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण, तपासणी नाके, चेक पोस्ट, लसीकरण केंद्र व तपासणी केंद्र इत्यादी ठिकाणी कामे करावी लागली आहेत.

शाळांना १ मे २०२१ पासून उन्हाळी सुट्‌या घोषित करण्यात आलेल्या आहेत. गेल्यावर्षीपासून घरातच कोंडलेल्या अवस्थेत असलेली बच्चे कंपनी तर अक्षरशः कंटाळून गेली आहे. मुख्यालय सोडताना व मुख्यालयी परत येताना कोविड-१९ संदर्भातील शासन व आरोग्य विभागाच्या सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या व दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याच्या मुख्य अटीवरच मुख्यालय सोडण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी, असे मत शिक्षक व्यक्त करीत आहेत.

Web Title: Allow teachers to leave headquarters even during summer vacations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.