शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

डीसीसीतून होणार खरीप अनुदानाचे वाटप

By admin | Updated: January 22, 2015 00:44 IST

शिरीष शिंदे , बीड खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५८ शांखामधून वाटप होणार आहे. डीसीसीचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष

शिरीष शिंदे , बीडखरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५८ शांखामधून वाटप होणार आहे. डीसीसीचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करुन राज्य शासनास पाठविले होते. जिल्ह्यासाठी एकुण १४४ कोटी रुपये मिळाले आहेत. दरम्यान, डीसीसी बँकेतून अवैधरित्या कर्ज वितरीत केल्याचे प्रकार समोर आल्यानंतर पोलीस, नियोजन यासह महत्वाची खाती बँकेतून काढण्यात आली होती. त्यामुळे बँकेच्या व्यवहारावर परिणाम झाला होता. बँकेतून खाती निघून गेली व वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे काही ठिकाणच्या शाखा काही कालावधीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. प्रशासकपदी मुकणे यांची नियुक्ती केल्यानंतर जुन्या थकबाकीदारांवर न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले. नऊ संस्थाच्या प्रॉपर्टीसाठीचे डिक्री प्रमाणपत्रही डीडीसीला मिळाले होते मात्र, कोणतीही कारवाई झाली नव्हती. वळवलेली खाती पुन्हा डीसीसीत परत आणण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक व्यवस्थापक व इरत वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करीत आहेत. डीसीसीमधून आर्थिक व्यवहार झाले तर बँक पुन्हा पूर्वपदावर येईल अशातला भाग नाही. पैशाचे आदान-प्रदान झाले तर त्याचा काहीसा लाभ बँकेला होईल. तसेच बँकेला मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या सात ते दहा दिवसांच्या ठेवी करुन राष्ट्रीयकृत बँकेत ठेवल्या तर त्याचे व्याज बँकेला मिळेल असा हेतू आहे.खरीप हंगाम नुकसान भरपाईची १४४ कोटी रुपयांची रक्कम अद्याप डीसीसीकडे जमा झाली नाही. तहसीलदारांमार्फत शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. कोणाला किती निधी द्यायचा हे यादीमध्ये असणार आहे. याद्या अंतिम केल्यानंतर अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे डीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण कदम यांनी सांगितले. ४जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासक पदी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. घाम गाळून मिळविलेला पैसा शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी बँकेत टाकला होता मात्र हा पैसा आजही मिळेनासा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप थकबाकीदारांवर कारवाईचा फास आवळला नसल्याने वसुली अद्यापही थंडच आहे़