शिक्षक पतसंस्थेच्या सभेत आरोप-प्रत्यारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:05 IST2021-09-27T04:05:37+5:302021-09-27T04:05:37+5:30

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत शाब्दिक चकमक -- औरंगाबाद : औरंगाबाद तालुका जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेच्या रविवारी ऑनलाइन पार पडलेल्या वार्षिक ...

Allegations in the meeting of Shikshak Patsanstha | शिक्षक पतसंस्थेच्या सभेत आरोप-प्रत्यारोप

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत आरोप-प्रत्यारोप

शिक्षक पतसंस्थेच्या

सभेत शाब्दिक चकमक

--

औरंगाबाद : औरंगाबाद तालुका जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेच्या रविवारी ऑनलाइन पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पदाधिकारी, संचालक मंडळ आणि शिक्षक समन्वय समितीच्या सदस्यांत शाब्दिक चकमक उडाली.

कार्यकारी संचालक मंडळाने जाणीवपूर्वक अभ्यासू सदस्यांचे माईक बंद केले, मर्जीतील सभासदांना नियमबाह्य कर्ज वाटप केले, संचालकांनी दिशाभूल करणारे उत्तरे देऊन विषयाला कलाटणी दिल्याचा आरोप विजय साळकर, दिलीप ढाकणे, रंजित राठोड, श्रीराम बोचरे, कैलास गायकवाड आदी सदस्यांनी केला. सभेवर बहिष्कार टाकल्याचे साळकर म्हणाले. चेअरमन महेंद्र बारवाल यांनी सभा शांततेत पार पडल्याचे सांगितले. कर्जमर्यादा १८ वरून २० लाख करून व्याज दर ९ टक्के देण्यासोबतच एकूण ६ ठराव मंजूर करण्यात आले. रशीद बेग, प्रकाश दाणे, राजेश भुसारी, रमेश जाधव, संतोष ताठे यांच्यासह १९३ सभासद ऑनलाइन उपस्थित होते.

Web Title: Allegations in the meeting of Shikshak Patsanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.