डीपीडीसीनेही दुर्लक्ष केल्याचा आरोप
By Admin | Updated: July 1, 2014 00:37 IST2014-07-01T00:29:02+5:302014-07-01T00:37:18+5:30
श्रीक्षेत्र माहूर: नेतेमंडळी व अधिकाऱ्यांचे तालुक्याकडे कायम दुर्लक्ष झाल्याने तालुका आजपर्यंत विकासात्मक बाबीत मागासलेला राहिला़ त्यात जिल्हा नियोजन समितीने शहरातील विकासात्मक

डीपीडीसीनेही दुर्लक्ष केल्याचा आरोप
श्रीक्षेत्र माहूर: नेतेमंडळी व अधिकाऱ्यांचे तालुक्याकडे कायम दुर्लक्ष झाल्याने तालुका आजपर्यंत विकासात्मक बाबीत मागासलेला राहिला़ त्यात जिल्हा नियोजन समितीने शहरातील विकासात्मक कामांबाबत दखल न घेतल्याने तालुक्याच्या मागासलेपणात भर पडत आहे़
शहरात वर्षभरात कोट्यवधी भाविक भक्त पर्यटकांची सतत वर्दळ असते़ तालुक्यात व शहरात एकमेव असलेल्या बसस्थानकात पाच एकर जागा असूनही दर्शनी भागात शॉपिंग कॉम्प्लेक्स, अद्ययावत बसस्थानक, प्रतीक्षालय इत्यादी सुविधा देण्याची अनेक वर्षापासूनच्या मागणीला आदिवासी उपाय योजनेतून ५० लाख रुपये सुशोभिकरणातून देवून बोळवण करण्यात आली आहे़ तसेच येथील म़रा़ वि़म़ कंपनी कार्यालयाकडेही ६ एकर जागा आहे़ या कार्यालयाच्या दर्शनी भागात रेणुका देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून मोठी जागा शिल्लक असल्याने येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स, कर्मचारी निवासस्ािने अद्ययावत कार्यालय तसेच प्रवासी निवारा बांधून देण्याचीही मागणी फार जुनी असूनही याकडे जिल्हा नियोजन समितीने सतत दुर्लक्ष केले़
तालुक्यात आदिवासी व बंजारा समाजाचे प्रमाण जास्त असूनही आदिवासींच्या मुलामुलींच्या शिक्षण रोजगारासाठी एकही शाळा, वसतिगृह किंवा उद्योग प्रशिक्षण यासाठी आजपर्यंत एकही इमारत सुद्धा बांधण्यात आली नाही़ तसेच बंजारा समाजाच्या मुला-मुलींसाठी एकही वसतिगृह किंवा उद्योगासाठी प्रशिक्षणकेंद्र सुरू करण्यात आलेले नाही़
माजी मुख्यमंत्री तथा खा़ अशोकराव चव्हाण हे जिल्ह्याचे खरे भूमिपूत्र व येथील देवस्थानाबद्दल आस्था तर परिसरातील जनतेच्या समस्या समजून घेणारे दूरदृष्टी असणारे लोकनेते असल्याने त्यांनी तीर्थक्षेत्र माहूरच्या विकासासाठी ७९ कोटी रुपयांचा निधी तर शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिल्याने शहरास तीर्थक्षेत्राला साजेशे रूपय येत असून इतर समस्यांविषयी तालुक्यातील नेते पदाधिकारी पाठपुरावा करू शकत नसल्याने नेते, पदाधिकाऱ्यांविषयी जनतेतून प्रचंड नाराजी होत आहे़ (वार्ताहर)
महत्त्वाचे म्हणजे येथे मृत्यूशय्येवर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय मंजूर होवूनही कुठलीच हालचाल झाली नाही़ महिनाभरात १०० पेक्षा जास्त अपघातांची नोंद होवूनही व गेल्या १० वर्षांपासून येथे ट्रॉमा केअर सेंटरची मागणी असताना अद्यापपर्यंत ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याविषयी कुणीही आवाज उठविलेला नाही़ त्यामुळे शेकडो अपघातग्रस्त नागरिकांना जीव गमवावा लागलेला आहे़