पुतळा दहनासाठी चिथावणीचा आरोप

By Admin | Updated: June 29, 2014 00:22 IST2014-06-29T00:17:50+5:302014-06-29T00:22:39+5:30

वसमत : येथे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन केल्याच्या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शनिवारी तालुक्यातील असंख्य शिवसैनिक वसमत येथे दाखल झाले.

The allegation of incitement of the statue | पुतळा दहनासाठी चिथावणीचा आरोप

पुतळा दहनासाठी चिथावणीचा आरोप

वसमत : येथे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन केल्याच्या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शनिवारी तालुक्यातील असंख्य शिवसैनिक वसमत येथे दाखल झाले. त्यांनी पुतळा दहन करणाऱ्यांचा तीव्र निषेध नोंदविला व या प्रकारास संपर्कप्रमुख सुहास सांमत यांनीच चिथावणी दिली असल्याचा आरोप बैठकीत केला. त्यावर डॉ. मुंदडा यांनी संतप्त सेना कार्यकर्त्यांना शांत करून पक्षातील गटबाजीला थारा देऊ नये, असे आवाहन केले.
वसमत येथे शुक्रवारी शिवसेनेची बैठक संपर्कप्रमुख सुहास सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली होती. बैठकीनंतर सेनेचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन काही कार्यकर्त्यांनी केल्याने खळबळ उडाली. शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांतून तीव्र नाराजीचा सूर उमटला. या घटनेचा निषेध करण्यासाठी वसमत येथील व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात तालुक्यातील शिवसैनिकांची शनिवारी बैठक झाली. बैठकीस माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, उपजिल्हा प्रमुख सुनील काळे, जि.प.चे शिक्षण सभापती रंगराव कदम, राजेश मुसळे, नारायण सवंडकर, अंकुश आहेर, बालाजी तांबोळी, बालाजी यशवंते, संभाजी बेले, राजेश पवार, दौलतराव आहेर, शिवाजी शिंदे, तान्हाजी कदम, रमेश स्वामी, दीपक हळवे, राजेश भोसले, डॉ. गोविंद ईपकलवार, योगेश चेपूरवार, काशीनाथ भोसले, रामकिशन झुंझुर्डे, कन्हैैय्या बाहेती, आनंद बडवणे, नागनाथ स्वामी, शिवदास बोड्डेवार, पंडीतराव डोणे, भास्कर चट्टे, नरेंद्र कमळू, माऊली झटे, मुंजाजी इंगोले यांच्यासह जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, नगरसेवक, सर्कल प्रमुख, शाखा प्रमुख व मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते हजर होते.
यावेळी प्रमुख वक्त्यांनी पक्षात गटबाजी करणाऱ्यांनी कुभांड रचून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मत व्यक्त केले. वसमतमधील सर्व शिवसैनिक एकत्रपणे विधानसभेवर भगवा फडकवतील, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री
डॉ.मुंदडा यांनी कार्यकर्त्यांनी चिथावणीला बळी पडू नये, पक्षात गटबाजी करणाऱ्यांना थारा देऊ नये, असे आवाहन केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न विधानसभेवर भगवा फडकविण्याचा आहे, ते स्वप्न साकार करण्यासाठी सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी सज्ज होण्याचे आवाहन केले.
लोकसभा निवडणुकीत सुभाष वानखेडे यांना ज्या मतदारसंघात मताधिक्य मिळालेले नाही. हदगावमध्ये ते लीड मिळवू शकले नाहीत.
किनवट, उमरखेडमध्ये लीड नाही, तेथे जावून पराभवाची कारणे शोधण्याऐवजी वसमत येथे येऊन गटबाजी करणे योग्य नसल्याचा टोलाही डॉ. मुंदडा यांनी लगावला.
एकंदरीत शिवसेनेतील गटबाजी विधानसभेच्या तोंडावर उफाळून आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. (वार्ताहर)

Web Title: The allegation of incitement of the statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.