महापौरांवर ‘किराणा’ घोटाळ्याचा आरोप

By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:20:23+5:30

औरंगाबाद : महापौर कला ओझा यांनी महापालिकेच्या खर्चातून बेहिशोबी किराणा माल खरेदी केला.

The allegation of 'gross' scam of the mayor is on | महापौरांवर ‘किराणा’ घोटाळ्याचा आरोप

महापौरांवर ‘किराणा’ घोटाळ्याचा आरोप

औरंगाबाद : महापौर कला ओझा यांनी महापालिकेच्या खर्चातून बेहिशोबी किराणा माल खरेदी केला. तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या प्रवास व पाहुणचार भत्त्यातही त्यांनी हात धुऊन घेतल्याचा खळबळजनक आरोप नगरसेवक मिलिंद दाभाडे यांनी केला. माहिती अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार महापौरांनी पदाचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करून पोलिसांत तक्रार द्यावी, अशी मागणी दाभाडे यांनी आज केली. महापौरांना खा. चंद्रकांत खैरे हे बळ देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी माजी विरोधी पक्षनेते प्रमोद राठोड, गटनेता मीर हिदायत अली यांची उपस्थिती होती. दाभाडे म्हणाले की, महापौरांनी दरमहा किराणा खरेदीवर लाखो रुपये खर्च दाखविला आहे. मागील २० महिन्यांत पालिकेतील व बाहेरील कुणालाही पाहुणचार झालेला नाही. त्यांनी स्वत:च्या नावाने पाहुणचाराची बिले उचलली आहेत, तर काही बिले जवळच्या व्यक्तीच्या नावाने उचलली आहेत. एकेका महिन्यात ४०-४० ‘बाथसोप’ची खरेदी दाखविण्यात आलेली आहे. किराणा पुरवठादाराचीदेखील चौकशीची मागणी त्यांनी केली.
बजेट बुक जाळल्यामुळे महापौरांनी पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिल्याने गुन्हा दाखल झाला. त्याचा सूड म्हणून हे प्रकरण बाहेर काढले का, असे विचारले असता दाभाडे म्हणाले की, तसे काहीही नाही. पालिकेत आलेला पैसा जनतेचा आहे. त्याची उधळपट्टी कशी होते आहे, हे दाखविण्यासाठी हे प्रकरण उघडकीस आणले.
प्रवास भत्त्यातही घोळ
महापौर पालिकेचे वाहन वापरत नाहीत. त्यामुळे त्यांना दरमहा ४० हजार रुपये प्रवास भत्ता दिला जातो. त्यातून त्यांच्या वाहनचालकाचे वेतन करावे लागते. मात्र, मनपाच्या आस्थापनेवरील दोन वाहनचालक त्यांना देण्यात आले आहेत. त्यातील एक चालक त्यांच्या खाजगी वाहनावर आहे. सुरेश साळवे, उत्तम मोकळे हे मनपाचे चालक महापौरांच्या खाजगी वाहनावर आहेत. दोघांना अनुक्रमे २१ हजार, १७ हजार इतके वेतन मनपा देते. ७ लाख रुपयांचे वेतन या चालकांनी मनपाकडून घेतले आहे.
महापौरांनी आरोप फेटाळले
महापौर कला ओझा यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. दाभाडे यांनी मागील २० महिन्यांत एकही सभा सुरळीत होऊ दिली नाही. बजेट बुक जाळल्यामुळे त्यांच्यावर केलेल्या पोलीस तक्रारीमुळे त्यांनी सूडभावनेने माझ्यावर आरोप केले आहेत. मनपा महापौरांना ज्या सुविधा देते, तेवढ्याच घेत आहे. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. किराणा माल, पाहुणचार भत्त्यात काहीही बदल केलेला नाही. ४० बाथसोप दोन-तीन महिन्यांच्या बिलातील असतील.
प्रशासनाचे मत असे...
नगरसचिव प्रमोद खोब्रागडे म्हणाले की, महापौरांना दोन वाहनचालक देता येतात.
कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्या आदेशानुसार दोन वाहनचालकांची नियुक्ती केलेली आहे. एक वाहनचालक जादा द्यावा लागतो.

Web Title: The allegation of 'gross' scam of the mayor is on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.