शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

स्वाधार शिष्यवृत्तीसाठी सारेच बेजार; पोर्टल होतेय सतत हँग

By विजय सरवदे | Published: May 06, 2024 7:53 PM

समाजकल्याणसाठी ‘व्हीपीडीए’ प्रणाली ठरतेय डोकेदुखी

छत्रपती संभाजीनगर : स्वाधार शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे ‘व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट’ (व्हीपीडीए) तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, यासंबंधीचे पोर्टल सातत्याने हँग होत असल्यामुळे समाजकल्याण विभागाचे कर्मचारी बेजार झाले असून सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील सुमारे साडेपाच हजार विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत अवघे १५०-२०० एवढेच अकाउंट तयार करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

आतापर्यंत ‘आरटीजीएस’ पद्धतीने विद्यार्थ्यांच्या खात्यावर ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जात होती. मात्र, शासनाने अनुदानाच्या सर्वच योजनांसाठी ‘व्हीपीडीए’ प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागाचे कर्मचारी सध्या ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीच्या लाभधारक विद्यार्थ्यांचे अकाउंट तयार करण्यात व्यस्त आहेत. राज्यभरातील विविध विभागांचा ‘व्हीपीडीए’ पोर्टलवर भार वाढल्यामुळे ते सतत हँग पडत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना एक तर सुटीच्या दिवशी किंवा कार्यालयीन वेळेनंतर अकाउंट तयार करावे लागत आहे. दुसरीकडे, अकाउंट तयार करताना काही बँकांचे आयएफसी कोड मॅच होत नाहीत. अनेक विद्यार्थ्यांच्या पोस्टाच्या बँकेचे कोडही अप्रूव्ह होत नाहीत. त्यामुळे कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. कॅन्सल चेक गरजेचे आहे. पण, अनेक विद्यार्थ्यांकडे चेक नाहीत. त्यामुळे सध्या तरी त्यांच्या बँक पासबुकची कलर झेरॉक्स घेतली जात असून तसे कोषागार कार्यालयास कळविण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांच्या स्वाधार शिष्यवृत्तीसाठी मार्चअखेर १९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र, विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याची तयारी सुरू असतानाच ही ‘व्हीपीडीए’ नवीन पद्धत लागू झाली. त्यामुळे तब्बल साडेपाच हजार विद्यार्थी रखडले आहेत. या विद्यार्थ्यांचे जस जसे अकाउंट तयार होतील, त्यानुसार त्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाणार आहे.

जूनमध्ये प्रतीक्षा यादी जाहीरसन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज जमा झाले असून अर्ज पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. साधारणपणे जूनमध्ये या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे समाजकल्याण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या विद्यार्थ्यांनीही पॅनकार्ड, खाते असलेल्या बँकेचा ‘आयएफसी’ कोड, कॅन्सल चेक तयार ठेवावेत, असे आवाहनही या कार्यालयाने केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबादScholarshipशिष्यवृत्ती