बद्रीनारायण बारवाले यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:14 IST2017-08-13T00:14:01+5:302017-08-13T00:14:01+5:30

बद्रीनारायण बारवाले यांना शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

 All-round homage to Badrinarayan Barwale | बद्रीनारायण बारवाले यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

बद्रीनारायण बारवाले यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : संकरित बियाणे उत्पादनाचे पितामह आणि स्वातंत्र्यसैनिक बद्रीनारायण बारवाले यांना शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी बद्रीनारायण बारवाले यांच्या बियाणे संशोधन, शिक्षण, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अतुल्य कार्याचा उल्लेख करुन आठवणींना उजाळा दिला.
राज्यमंत्री खोतकर म्हणाले, जालना जिल्ह्यासह शहराचा विकास व्हावा, अशी डॉ. बारवाले यांची मनोमन इच्छा होती. अनेक वेळा ते त्यासंबंधी आम्हाला बोलावून चर्चा करायचे व जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतीही मदत अथवा मार्गदर्शन करण्यास त्यांनी सदैव तत्परता दाखविली. जालना जिल्ह्याची ओळख देशासह विदेशातही त्यांच्या कार्यामुळेच, असल्याचे ते म्हणाले. तसेच खा. दानवे म्हणाले की, जालना जिल्ह्यात एवढ्या मोठ्या उंचीचा व जगभर जिल्ह्याचा नाव करणारा व्यक्ती होणार नाही.

Web Title:  All-round homage to Badrinarayan Barwale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.