गर्लगँगसोबत अलियाची मस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:02 IST2021-02-09T04:02:56+5:302021-02-09T04:02:56+5:30
सध्या आलिया भट व्हॅकेशन मोडवर आहे. बहिण शाहिन तसेच अनुष्का व आकांक्षा रंजन या मैत्रिणींसोबत आलियाचे मालदीवचे फोटो सोशल ...

गर्लगँगसोबत अलियाची मस्ती
सध्या आलिया भट व्हॅकेशन मोडवर आहे. बहिण शाहिन तसेच अनुष्का व आकांक्षा रंजन या मैत्रिणींसोबत आलियाचे मालदीवचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ‘कहो ना प्यार है’ या गाण्यावर समुद्र किनाऱ्यावर थिरकतानाचा या गर्लगँगच्या एका व्हिडिओने सुद्धा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. मालदीव निळाशार समुद्र किनारा आणि गर्लगँगसोबत आलियाची धम्माल मस्ती पाहण्यासारखी आहे. अलीकडे आलियाला कामाच्या ताणामुळे रूग्णालयात भरती करावे लागले होते.सततच्या शूटींगमुळे तिला प्रचंड अशक्तपणा आला होता. कामाचा हा ताण दूर करण्यासाठीच आलिया गर्लगँगसोबत सुट्टीचा प्लान बनवला असावा. फोटो पाहून तरी आलियाचा सर्व ताण संपलेला दिसतोय.
सैफ अली खानही घेणार पितृत्व रजा
दुसऱ्या प्रसूतीपूर्वी करीना कपूरने हातात असलेल्या सगळ्या प्रोफेशनल कमिटमेंट तिने पूर्ण केल्या आहेत. तर सैफ सुद्धा आपल्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. इतकेच नाही तर बाळाला अधिकाधिक वेळ देता यावा म्हणून सैफ पॅटर्निटी लिव्ह अर्थात पितृत्व रजा घेणार आहे. एका मुलाखतीत त्याने ही माहिती दिली. घरी नवा पाहुणा येणार असेल, पत्नीची प्रसूती होणार असताना कोणाला काम करायला आवडेल? आपल्या मुलाला वाढताना बघण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही चुकताय. त्यामुळे मी माझ्या बाळासोबत मनसोक्त वेळ घालवणार आहे, असे सैफ म्हणाला.
पुन्हा एकत्र दिसणार अजय देवगण- अमिताभ बच्चन
अजय देवगणच्या नव्या सिनेमाचे नाव 'मे- डे' आहे. सिनेमाच्या निर्मात्यांकडून 'मे-डे'बाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. या सिनेमाच्या एका महत्त्वाच्या भागाचे शूटिंग हैदराबादमध्ये करण्यात आले. या सिनेमात अजय देवगण आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. यापूर्वी 'सत्याग्रह'मध्ये दोन्ही स्टार एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले होते. दीर्घकाळानंतर दोघे एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग केले आहे. यावेळी सेटवर कोविड संसर्ग रोखण्यासाठी बरीच खबरदारी घेतली गेली होती.