सतर्कतेचे आदेश

By Admin | Updated: August 29, 2014 01:30 IST2014-08-28T23:03:32+5:302014-08-29T01:30:07+5:30

बीड : विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन शुक्रवारी होत आहे़ बाप्पांच्या स्वागताची भाविकांनी जय्यत तयारी केली आहे़ जिल्ह्यात ७५० मंडळे स्थापन झाली असून गुरुवारी मूर्ती खरेदीसाठी

Alert order | सतर्कतेचे आदेश

सतर्कतेचे आदेश


बीड : विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन शुक्रवारी होत आहे़ बाप्पांच्या स्वागताची भाविकांनी जय्यत तयारी केली आहे़ जिल्ह्यात ७५० मंडळे स्थापन झाली असून गुरुवारी मूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी झाली़ दरम्यान, दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत़ उत्सवात बारीकसारीक हालचालींवर करडी नजर राहणार आहे़
दुष्काळीस्थिती असतानाच गत आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली़ त्यामुळे सर्वांचाच उत्साह दुपटीने वाढला आहे़ पावसाच्या सरींमुळे झालेला आनंद द्विगुणित करण्यासाठी भक्तगण सरसावले आहेत़ येथील सिद्धीविनायक संकूल परिसरात श्रींच्या आकर्षक मूर्ती दाखल झाल्या आहेत़ मूर्ती खरेदीसाठी गुरुवारी भक्तांची गर्दी झाली होती़ दिवसभर खरेदीची धूम सुरु होती़
दरम्यान, जिल्ह्यात ७५० गणेश मंडळे स्थापन झाली आहेत़ धर्मादाय कार्यालयाकडून या मंडळांनी रितसर परवाना घेण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत़ एकट्या बीड शहरात जवळपास दोनशे परवानाधारक मंडळे आहेत़ गुरुवारी सायंकाळपर्यंत ५०० परवान्यांचे वाटप झाले होते़ जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे़ मंडळांनी मूर्तीची स्थापना सुरक्षित ठिकाणी करावी, मूर्तीचे पावित्र्य भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, त्यासाठी स्वयंसेवक नेमावेत, अशा सूचना अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांना मंडळांना दिल्या आहेत़
बीड, परळीत पथसंचलन
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने परळीमध्ये बुधवारी तर बीडमध्ये गुरुवारी पोलिसांनी पथ संचलन केले.
परळी येथे शहर पोलीस ठाणे, राणी लक्ष्मीबाई टॉवर, एक मिनार चौक, उड्डाण पूल, सुभाष चौक, गणेशपार, अंबेवेस यामार्गे पोलिसांनी पथ संचलन केले. यावेळी शहर ठाण्याचे पोनि धरमसिंग चव्हाण, सपोनि अभिजीत वीसपुते, पोलीस उपनिरीक्षक ऐटवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
बीड शहरातील शिवाजीनगर ठाणे येथून दुपारी चारच्या सुमारास पथसंचलनाला सुरूवात झाली़ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्थानक परिसर या मार्गे अण्णा भाऊ साठे चौक, सुभाष रोड, माळीवेस, बलभीम चौक, बशीरगंज मार्गे अधीक्षक कार्यालयात पथसंचलनाचा समारोप झाला़ यावेळी अपर पोलीस अधीक्षक माधव कारभारी, उप विभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे, शिवाजीनगर ठाण्याचे पो़ नि़ उमेश कस्तुरे यांच्यासह अधिकारी, दंगल नियंत्रण पथकाचे कर्मचारी सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)
गणेश मूर्तीच्या किंमतीमध्ये यंदा २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे़
४बाजारात ५० रुपयांपासून ते ३० हजार रुपयापर्यंतच्या मूर्ती उपलब्ध आहेत़
४बहुतांश मंडळांनी गुरुवारीच मूर्ती खरेदी करणे पसंत केले़
४मूर्ती प्रतिष्ठापणेनंतर सजावटीसाठी लागणारे आकर्षक साहित्य बाजारात उपलब्ध झाले आहे़ त्याचीही खरेदी झाली़
गणेशोत्सवादरम्यान जिल्ह्यातील पोलिसांच्या मदतीला बाहेरून कुमक मागविली आहे़ दोन उपअधीक्षक, सहा निरीक्षक, १५० पोलीस, १०० महिला कर्मचारी, ६०० होमगार्ड, १०० महिला होमगार्ड, २० फौजदार व राज्य राखीव दलाची एक तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे़ बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर आहे़ उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी केले आहे़

Web Title: Alert order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.