शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दारू, चाकू आणि गुन्हेगाराचा शिरसाटांच्या घरात घुसण्याच्या प्रयत्न; पोलीसांचा निष्कर्ष काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:18 IST

सौरभ भोलेच्या नाट्यमय प्रवेशाने खळबळ; गुन्हेगार असल्याने प्रकरणाला मिळाले गंभीर वळण

छत्रपती संभाजीनगर : हाणामारी, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपी सौरभ अनिल भोले (२४, रा. समतानगर, क्रांती चौक) याने पोलिस सुरक्षा भेदून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार केवळ दारूच्या नशेत झाला असून, त्याचा अन्य उद्देश नव्हता, अशा निष्कर्षावर पोलिस पोहोचले आहेत. गुरुवारी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

२० जुलै रोजी रात्री ११ वाजता शिरसाट घरी पोहोचले असता, त्यांचा ताफा घरात जात असताना सौरभने ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा ताफ्यातील पोलिसांना अरेरावी करत धक्काबुक्की केली. वैद्यकीय तपासणीत तो दारू प्यायल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कलम ८५ प्रमाणे कारवाई करण्यात आली. सोमवारी दिवसभर त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी कलमांमध्ये वाढ करत अटक करण्यात आली. तेव्हा न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

का मिळाले गंभीर वळणपालकमंत्री संजय शिरसाट हे अतिमहत्त्वाचे व्यक्ती असून, विनाक्रमांकाच्या दुचाकीसह सौरभ ताफ्यात घुसून बंगल्याकडे वळला. त्याच्या दुचाकीत चाकू देखील सापडला. या कृत्याआधी तो हर्सूल कारागृहातून नुकतेच जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांसोबत दुपारपासून पार्टी करत होता. शिवाय, शिरसाट यांनी स्वत: तो खुनातील आरोपी असल्याने, त्यांच्यावर हल्ल्याचा देखील हा कट असल्याचा संशय व्यक्त केला. परिणामी, या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले.

पडेगावला जायचा रस्ताच कळला नाही३०-३० घोटाळ्यातील आरोपी पंकज जाधव नुकताच जामिनावर सुटला. सौरभची त्याची कारागृहात मैत्री झाल्याने, अन्य मित्रांसोबत त्यांनी दुपारपासून पार्टी केली. रात्री तो पंकजच्या घरी पोहोचला. पंकजचे घर त्याच परिसरात आहे. तेथून दुचाकीने पडेगावच्या दिशेने निघाला. मात्र, नशेत त्याला रस्ताच कळला नाही. शिरसाट यांचा ताफा निघाल्यानंतर, त्याला तो पुढे रस्ताच असल्याचे वाटल्याने तो थेट ताफ्यात घुसल्याचा निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले आहेत.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटCrime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर