शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बदलती लाइफस्टाइल! महिलांमध्येही वाढले ‘चिअर्स’चे प्रमाण; ग्रामीण महिलाही मद्याच्या आहारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 05:35 IST

लोण मेट्रो सिटीतील लहानसहान शहरात

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : चार मित्र एकत्र आले तर फेसाळत्या ग्लासासह रंगणाऱ्या ‘चिअर्स पार्ट्या’ हे समीकरण आता मागे पडले आहे. आता तरुणी आणि महिलाही  कोणताही विधिनिषेध न बाळगता ‘चिअर्स’ करण्याची संधीच शोधत असून, नारी जातीतही व्यसनाधीनता वाढते आहे.  चक्क राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानेच यावर बोट ठेवले आहे. सध्या हे प्रमाण कमी असले तरी मेट्रो सिटीतील लोन सर्वत्र पोहोचले आहे. ही बदलती लाइफ स्टाईल  चिंतेचा विषय ठरते आहे. 

राज्यात १५ ते ४९ वयातील व्यक्तींमध्ये दारू पिण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात सध्यातरी महिलांचे प्रमाण एक टक्क्याहून कमी आहे. परंतु मागील पाच वर्षांच्या तुलनेत त्यात वाढ होते आहे. त्यातही ग्रामीण भागातील महिलांपेक्षा शहरातील महिलांमध्ये दारूचे आकर्षण वाढले आहे. 

मुंबई, पुणे, सोलापूर पेक्षा औरंगाबाद जास्त ‘नशिले’

मुंबई, पुणे व सोलापूर या शहरांना औरंगाबादेतील पुरुषांनी दारू पिण्यात चक्क मागे टाकले आहे. एकूण टक्केवारी पाहता औरंगाबादेतील १३.७ टक्के पुरूष दारू रिचवतात असे हा अहवाल म्हणतो. 

महिला का पितात?

  • ताणतणाव, नैराश्य.
  • सहज घेणे मग व्यसन जडणे. 
  • मित्रांचा आग्रह. माॅडर्न लाइफ स्टाइलचा भाग म्हणून. पती घेतो म्हणून. 
  • पुरुषांची बरोबरी.

आर्थिक, भावनिक स्वातंत्र्य, घरकाम, नोकरी इ.मुळे ताण वाढतो. जवळची व्यक्ती समजून घेत नसतील तर व्यसन करावे वाटते. मी वेगळी आहे हे दाखविण्यासाठीही महिला व्यसनाकडे वळतात.- डॉ. संदीप सिसोदे, अध्यक्ष, मानसशास्त्रीय वेल्फेअर असोसिएशन

१५ वर्षांवरील मद्यपानशहर    महिला    पुरुष औरंगाबाद    ०.२%    १३.७%मुंबई    ०.३%    १०.०%नागपूर    ०.४%     १७.८% पुणे     ०.२%     ११.६%नाशिक    ०.२%    १२.२% सोलापूर    ०.३%    १३.१%

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMumbaiमुंबईPuneपुणे