शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अख्खे पंढरपूर उठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:24 IST

औरंगाबाद - वाळूज महानगर : शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून अख्खे पंढरपूर वसलेले आहे. याशिवाय बाजुचे वळदगाव आणि तिसगावमधील काही भागही अतिक्रमणाच्या विळख्यात आहे.

औरंगाबाद - वाळूज महानगर : शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून अख्खे पंढरपूर वसलेले आहे. याशिवाय बाजुचे वळदगाव आणि तिसगावमधील काही भागही अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. ही अतिक्रमणे दोन महिन्यांच्या आत हटविण्यात यावीत, या आशयाच्या नोटिसा जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी बजावल्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात नागरिकांनी गाव बचाव कृती समिती स्थापन करून आंदोलनाचा इशारा दिला आहे. अतिक्रमण हटविल्यास त्याची सर्वाधिक झळ ही पंढरपूर गावाला बसणार आहे. संपूर्ण गावच सरकारी गायरान जमिनीवर वसलेले आहे. पंढरपूर येथील गट क्रमांक १२, १३ व १७५ या शासकीय जमिनीवर जवळपास पाच- सहा दशकांपासून पक्की घरे आहेत. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत, यासंबंधीची याचिका पंढरपूर येथील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मराठवाडा उपाध्यक्ष लक्ष्मीनारायण राठोड यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. तत्पूर्वी, राठोड यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीकडे अतिक्रमणे काढण्याबाबत निवेदने सादर केली होती. याचिकेवर परवा सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने जिल्हा परिषदेने यासंदर्भात कोणती पावले उचलली, अशी विचारणा केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने आज ५ आॅगस्ट रोजी गटविकास अधिकाऱ्यांना अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशान्वये गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत ग्रामस्थांना येत्या दोन महिन्यांत अतिक्रमणे हटविण्याच्या नोटिसा बजावल्या.पंढरपूर हे गाव औरंगाबाद -पुणे रस्त्यावर वसलेले आहे. या महामार्गालगत सार्वजनिक बांधकाम विभाग, औद्योगिक विकास महामंडळ आणि सरकारी गायरान जमीन आहे. या तिन्ही प्राधिकरणाच्या जमिनीवर अतिक्रमण करून पंढरपूर गाव वसलेले आहे. त्यानुसार बांधकाम विभागाने अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. नोटिसा प्राप्त होताच ग्रामपंचायत प्रशासनही पुरते हादरले असून दोन दिवसांत ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलावण्यात आली असून यासंबंधी पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी एस.बी. शेवंते यांनी सांगितले.न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई- उपमुख्य कार्यकारी अधिकारीया प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात लवकरच सुनावणी होणार असून अ‍ॅड. अमोल जगतकर यांच्याशी चर्चा करून जिल्हा परिषदेची बाजू मांडण्यात येईल. शासन निर्णयानुसार अतिक्रमणे काढण्यात यावीत अशा नोटीसा बजावण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले.पंढरपुरातील अतिक्रमणे वाचविण्यासाठी नागरिकांनी शुक्रवारी गाव बचाव कृती समिती स्थापन केली आहे. या कृती समितीची पंढरपुरात बैठक घेऊन सदरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. या बैठकीला कृती समितीचे के.व्ही. गायकवाड, कमलेश इंगळे, माजी उपसभापती लताबाई कानडे, माजी सरपंच महेबूब चौधरी, हारुण चौधरी, शेख अख्तर, विजय उबाळे, साहेबराव दाभाडे, राजू उबाळे, विजय जाधव, सुमनबाई उबाळे, विजय गिऱ्हे, उपसरपंच महेंद्र खोतकर, बाळासाहेब राऊत, साबेरा पठाण, सुलताना शेख, नजमा चाऊस, हरिश्चंद्र बन्सोडे आदींसह शेकडो अतिक्रमणधारकांची उपस्थिती होती.पाडापाडीच्या या निर्णयानंतर पंढरपूर ग्रामपंचायतीने तातडीने शनिवारी यावर तोडगा काढण्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे. त्यात पुढील भूमिकेबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी एस. बी. शेवंते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पंढरपुरातील गट क्रमांक १२, १३ व १७५ मध्ये अनेकांनी शासकीय जागेवर अतिक्रमणे केली आहेत. सरपंच, उपसरपंचासह सर्वच सदस्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत. त्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी. गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या अतिक्रमणाला आपला विरोध नसून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या अतिक्रमणाला विरोध आहे.- लक्ष्मीनारायण राठोड (याचिकाकर्ते)विशेष म्हणजे संपूर्ण गावच शासकीय जागेवर वसलेले असल्यामुळे सरपंच, उपसरपंचासहित सर्वच सदस्यांची गावात अतिक्रमणे आहेत. प्रशासन चुकीच्या पद्धतीने प्रकरण हाताळत असल्याचा आरोप अतिक्रमणधारकांतून होत आहे. पाच दशकांपासून अतिक्रमणे होत असताना प्रशासनाने आतापर्यंत बघ्याची भूमिका का घेतली, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.