शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक नेत्यांना अजित पवारांची तंबी

By admin | Updated: August 6, 2014 02:23 IST

मोहन बोराडे , सेलू लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम करणाऱ्यांची पक्षाला गरज नाही. त्यामुळे आताच त्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करावी,

मोहन बोराडे , सेलूलोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम करणाऱ्यांची पक्षाला गरज नाही. त्यामुळे आताच त्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करावी, अशी तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे आयोजित निर्धार मेळाव्यात दिल्याने लोकसभा निवडणुकीत पक्ष उमेदवाराच्या विरोधात काम केलेले स्थानिक नेते चांगलेच घायाळ झाल्याचे पहावयास मिळाले.सेलूत येथील श्रीराम प्रतिष्ठाणच्या विद्याविहार संकुलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परभणी जिल्हा निर्धार मेळाव्याचे आयोजन ५ आॅगस्ट रोजी करण्यात आले होते त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते़ यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री सुरेश धस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ विक्रम काळे, अ‍ॅड़ गणेशराव दुधगावकर, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, आ़ रामराव वडकुते, महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जू लाला, डॉ़ मधुसूदन केंद्रे, डॉ़ संजय रोडगे, राजेश विटेकर, सुरेश जाधव, बाळासाहेब जामकर , सारंगधर महाराज, अशोक काकडे, विनायक पावडे, राजेंद्र लहाने, प्रसाद बुधवंत, अजय चौधरी, माऊली ताठे, प्रताप सोळंके, अ‍ॅड़ रामेश्वर शेवाळे, सुरेश भुमरे आदींची उपस्थिती होती़उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काहींनी काम केले. विरोधात स्पर्धक उमेदवाराला मतदान करण्याचे फोन केले गेले. अशांनी आताच त्यांच्या कामात सुधारणा करावी, असा सज्जड दम त्यांनी यावेळी दिला. यामुळे पक्षविरोधी काम केलेल्या पक्षातील काही नेत्यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले. पवार म्हणाले, केंद्राच्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली. त्याबाबत महाराष्ट्रातील खासदार गप्प राहतात़ मात्र खराब चपाती मिळाल्यानंतर महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱ्यांच्या तोंडात ती कोंबतात. मोदी लाटेत निवडून आलेल्या महायुतीच्या खासदारांना कुठलाही अनुभव नाही़ रेल्वे प्रश्नासाठी या खासदारांनी काय केले, असा सवाल उपमुख्यमंत्री पवार यांनी उपस्थित करून केंद्र सरकारवर टीका केली. ‘अच्छे दिन आने वाले है’ हे म्हणणारे आज कुठेही दिसत नाहीत. सत्तेत आल्यानंतर भाजपाने सर्वत्र महागाई करून लोकांची दिशाभूल केली. भाजपाला निवडणुकीत बहुजन चेहरा लागतो. मात्र सत्ता येताच दुसरेच चेहरे समोर येतात़ मूठभर लोकांचे राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकवील़ पंतप्रधान नेपाळला आर्थिक मदत देतात मात्र येथील शेतकऱ्यांना मदत देत नाहीत, असा आरोप करून अजित पवार यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. प्रास्ताविक प्रदेश चिटणीस डॉ़ संजय रोडगे यांनी केले.