शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार विमान अपघाताच्या अहवालात तफावत; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 13:45 IST

महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याच्या जाण्याने राज्याला वेदना झाल्या आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे

छत्रपती संभाजीनगर: "अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास करणाऱ्या दोन सरकारी कंपन्यांनी वेगवेगळी कारणे दिली आहेत, त्यामुळे या प्रकरणातील शंकेला मोठा वाव आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याच्या जाण्याने राज्याला वेदना झाल्या आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे," असे खळबळजनक विधान शिवसेना प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी आज येथे केले.

विमान प्रकरणावर टीकास्त्रजय पवार यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवर भाष्य करताना शिरसाट म्हणाले की, "कॉकपिटमध्ये पायलट शेजारी बसून झोपणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. जर कंपनीचा मालकच असे जीवघेणे धाडस करत असेल, तर हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे. अशा पायलटांवर कारवाई व्हायलाच हवी."

संजय राऊतांना 'आंतरराष्ट्रीय' टोलासंजय राऊत यांच्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरील भाष्यावर शिरसाट यांनी सडकून टीका केली. "संजय राऊत यांना देशाच्या बॉर्डरवर नेऊन ठेवा, ते तिथे काहीतरी संदेश देतील. आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये नाक खुपसण्याची त्यांना गरज नाही, आमचे पंतप्रधान सक्षम आहेत. राऊत सध्या डोक्यावर पडल्यासारखी वक्तव्ये करत आहेत," असा टोला त्यांनी लगावला.

गणेश नाईक आणि अंतर्गत वादश्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या गणेश नाईक यांचाही शिरसाटांनी समाचार घेतला. "नाईक स्वतःचे खाते सांभाळू शकत नाहीत आणि शिंदेंना टार्गेट करत आहेत. आमच्या नादी लागलात, तर तुमच्याबद्दलची सर्व माहिती बाहेर काढू," असा इशारा त्यांनी दिला. तसेच, अमोल मिटकरींच्या विधानावर बोलताना त्यांनी मान्य केले की, पक्षात काही लोक ग्राउंड लेव्हलला 'झिरो' असतात पण विद्वत्ता दाखवण्याचा प्रयत्न करतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's plane accident report discrepancies; Shirsaat demands thorough inquiry.

Web Summary : Sanjay Shirsat alleges discrepancies in Ajit Pawar's plane crash report, demanding investigation. He criticizes pilot behavior and Sanjay Raut's international comments, warning Ganesh Naik about internal disputes.
टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटAjit Pawarअजित पवारGanesh Naikगणेश नाईक