शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'२ तास मावशीपाशी बसले अन् मनमोकळं बोलले'; फुलंब्रीच्या मातीशी होतं अजितदादांचे प्रेमाचं नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 16:16 IST

अजितदादांचे फुलंब्रीशी होते रक्ताचे आणि रक्तापलीकडचे नाते; मावशीच्या गावात शोककळा

फुलंब्री: महाराष्ट्राच्या राजकारणातील 'लोहपुरुष' अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फुलंब्रीशी असलेले नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक होते. फुलंब्री हे दादांच्या मावशीचे गाव असल्याने, या मातीशी त्यांचे बालपणापासूनचे ऋणानुबंध जोडले गेले होते. आज दादांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण फुलंब्री तालुका सुन्न झाला असून, देशमुख कुटुंबासह गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.

मावशीच्या कुशीत विरघळणारा 'कडक' बाणाअजितदादांच्या मावशी सुषमा बाळासाहेब देशमुख या फुलंब्रीतील असल्याने, बालपणीच्या अनेक उन्हाळी सुट्ट्या दादांनी याच गावात घालवल्या होत्या. त्यांचे मावसभाऊ नितीन देशमुख सांगतात की, "दादा कितीही मोठे झाले किंवा व्यस्त असले, तरी छत्रपती संभाजीनगरला आले की मावशीला भेटल्याशिवाय जात नसत. राजकारणातील कठोरपणा बाजूला सारून ते इथे केवळ एक 'भाचा' म्हणून वावरत असत."

अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!

कोरोनातील 'ती' शेवटची भेट कोरोनाच्या अत्यंत कठीण काळातही दादांनी आपल्या मावशीची भेट घेण्यासाठी वेळ काढला होता. त्यावेळी त्यांनी सुषमा देशमुख यांच्याशी दोन तास मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. दुर्दैवाने त्यानंतर काही दिवसांतच मावशीचे निधन झाले. मावशीच्या जाण्याने हळवे झालेले दादा आज स्वतःच अनंत प्रवासाला निघून गेल्याने या नात्याचा एक मोठा दुवा कायमचा तुटला आहे.

विकासाचा ध्यास अजितदादांनी फुलंब्रीच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला. पाथ्री, निधोना परिसरातील ३३ केव्ही विद्युत केंद्राचा प्रश्न असो किंवा आर्थिक अडचणीत सापडलेला देवगिरी सहकारी साखर कारखाना असो; दादांनी नेहमीच मदतीचा हात दिला. साखर कारखान्याला अवसानातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका फुलंब्रीतील शेतकरी कधीही विसरणार नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar's Fulambri Connection: Cherished Aunt, Development Focus, Mourned Loss

Web Summary : Ajit Pawar shared a close bond with Fulambri, his aunt's village. He visited her often, even during the pandemic. Pawar championed Fulambri's development, aiding its sugar factory and electrical infrastructure. His passing has left the community in deep sorrow.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर