शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सामान्यांत रमणारे अजितदादा; छ. संभाजीनगरमध्ये इमरती-भजी खातानाची हळवी आठवण ताजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 20:29 IST

Ajit Pawar Death: "चांगला चहा टपरीवरच मिळतो!" अजितदादांच्या निधनानंतर संभाजीनगरमधील प्रसिद्ध इमरतीची आठवण पुन्हा ताजी

छत्रपती संभाजीनगर : अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. शिस्तप्रिय, कडक प्रशासक अशी ओळख असलेल्या अजितदादांचा एक अत्यंत साधा, हळवा आणि सामान्यांशी नाळ जोडणारा कोपरा छत्रपती संभाजीनगरकरांनी जवळून अनुभवला होता. त्यांच्या निधनानंतर त्या आठवणी ताज्या होत आहेत.

९ ऑक्टोबर २०१८ रोजी ‘संविधान बचाव रॅली’च्या निमित्ताने अजित पवार आणि खा. सुप्रिया सुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. कार्यक्रमानंतर कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल, ताफा किंवा पंचतारांकित हॉटेलचा तामझाम न ठेवता दादांची गाडी थेट जुन्या शहरातील एका प्रसिद्ध मिठाई दुकानाकडे वळली. सामान्य ग्राहकांतच अजितदादांनी इम्रती, जिलेबी-भज्यांचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आ. सतीश चव्हाण व आ. विक्रम काळे हे दोघेही होते. त्यांनी शहरातील या इम्रती व भज्यांचा इतिहास सांगितला.

चव टपरीवरच्या चहातच असते...याच वेळी पत्रकारांशी बोलताना दादांनी आपली साधी जीवनदृष्टी स्पष्ट केली होती. “फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये फक्त तामझाम असतो, पण खरं प्रेम आणि चव ही छोट्या हॉटेल्समध्ये किंवा टपरीवरच्या चहातच मिळते.’’ त्यांचे हे वाक्य त्यांच्या आयुष्याचं सार सांगून जातं. सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर असूनही त्यांचं मन सामान्यांच्या वस्तीत आणि साध्या चवीत रमत होतं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी हॉटेलमध्ये इम्रती बनविणाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढली होती. या ८ वर्षांपूर्वीच्या आठवणी शहरवासीयांच्या मनात ताज्या झाल्या. शिस्तीचा धाक, निर्णयांची धडाडी आणि मनातला साधेपणा यांचा संगम असलेले अजित पवार आता फक्त आठवणीत उरले आहेत. पण शहरातील या आठवणी कायम लोकांच्या मनात जिवंत राहतील.

एवढे आवडले की, इम्रती, भजे पार्सलही नेलेअचानक अजित पवार व सुप्रिया सुळे आमच्या हॉटेलमध्ये आल्या, तेव्हा आम्ही त्यांची व्यवस्था कशी करायची, यामुळे गोंधळलो होतो. आम्ही त्यांच्या बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करीत असताना दादा म्हणाले की, काही गरज नाही. आम्ही बाकावर बसूनच इम्रती खाऊ. त्यांनी पार्सलही नेले. त्यांचे हे साधे जगणे मला आयुष्यात खूप शिकवून गेले.सुभाष कच्छवा, हॉटेल व्यावसायिक

दादांची ती फिलॉसॉफीटपरीवरचा चहा आणि छोटं हॉटेल यावेळी पत्रकारांशी बोलताना दादांनी आपलं साधेपण अधोरेखित केलं होतं. ते म्हणाले होते, "तुम्हाला फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये तामझाम पाहायला मिळेल, तिथले पदार्थ उत्तम असतीलच असे नाही. पण उत्तम खाद्य हे छोट्या हॉटेलमध्ये आणि चांगला चहा हा टपरीवरच मिळतो." दादांचे हे शब्द आजही त्यांच्या सामान्यांशी असलेल्या नाळची साक्ष देतात.

लोकनेता आता केवळ आठवणीतखासदार सुप्रिया सुळे यांनीही यावेळी 'बहीण-भावाच्या' या नात्यातील प्रवासाचे किस्से सांगितले होते. आज दादांच्या निधनानंतर मिठाई शॉपच्या त्या रिकाम्या खुर्च्या पाहून जुन्या छत्रपती संभाजीनगरमधील नागरिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भावूक झाले आहेत. महाराष्ट्राचा हा 'साधा' आणि 'धाडसी' लोकनेता आता केवळ आठवणींच्या रूपात आपल्यात उरला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Dada, a man among commoners: Remembering sweet moments.

Web Summary : Ajit Pawar's simple side, revealed during a 2018 visit to Chhatrapati Sambhajinagar, is fondly remembered. He eschewed VIP treatment, enjoying local sweets and tea, highlighting his connection with ordinary people. His philosophy of finding the best food in humble settings resonated deeply.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर