कुख्यात घरफोड्या अजय ठाकूरचा फौजदारावर हल्ला

By Admin | Updated: July 22, 2016 00:44 IST2016-07-22T00:03:28+5:302016-07-22T00:44:43+5:30

औरंगाबाद : कुख्यात घरफोड्या अजय ठाकूर याने त्यास पकडण्यासाठी आलेले गुन्हे शाखेचे फौजदार अनिल वाघ यांच्या अंगावर थेट पल्सर मोटारसायकल घालून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

Ajay Thakur's attack on the infamous house-escape | कुख्यात घरफोड्या अजय ठाकूरचा फौजदारावर हल्ला

कुख्यात घरफोड्या अजय ठाकूरचा फौजदारावर हल्ला

औरंगाबाद : अनेक महिन्यांपासून पोलिसांना चकमा देणारा कुख्यात घरफोड्या अजय ठाकूर याने त्यास पकडण्यासाठी आलेले गुन्हे शाखेचे फौजदार अनिल वाघ यांच्या अंगावर थेट पल्सर मोटारसायकल घालून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यावेळी वाघ यांनी प्रसंगावधान राखून बाजूला उडी घेतल्याने ते बालंबाल बचावले. मात्र त्यानंतरही त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. एखाद्या सिनेमातील प्रसंगाप्रमाणे बीड बायपासवर हा थरार गुरुवारी रात्री नागरिकांना अनुभवायला मिळाला.
याविषयी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती म्हणाले की, कुख्यात घरफोड्या अजय ठाकूर मोक्काच्या गुन्ह्यातील फरार आरोपी आहे. शिवाय न्यायालयानेही त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलेले आहे. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. तो जालना येथे गेल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना सांगितली. त्यामुळे गुन्हे शाखेचे फौजदार अमित बागूल, फौजदार प्रशांत आवारे, सहायक फौजदार ससाणे यांचे पथक जालना येथे त्यास पकडण्यासाठी गेले होते. यावेळी साध्या वेशातील बागूल यांना त्याने ओळखले. त्यांना चकमा देऊन तो जालना येथून निसटला. जालन्याकडून औरंगाबादकडे येणाऱ्या मार्गावर पोलिसांनी सापळा रचला होता आणि अजय हा मोटारसायकलवर होता. औरंगाबादेत न येता तो अंबडमार्गे गेला. त्यानंतर तो बीड बायपास रोडने गेल्याचे समजले. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी फौजदार अनिल वाघ आणि कर्मचाऱ्यांना बीड बायपास रोडवर सापळा रचण्यास सांगितले. त्यानंतर फौजदार वाघ, कर्मचारी मनोज चव्हाण, संतोष सूर्यवंशी, शिवाजी भोसले बीड बायपासवर त्याला पकडण्यासाठी खाजगी वाहनात बसून होते. तो दिसताच फौजदार वाघ हे त्यास आडवे झाले. त्यावेळी सिनेस्टाईलने अजय याने थेट वाघ यांच्या अंगावर मोटारसायकल घातली. त्यावेळी वाघ यांनी बाजूला उडी घेतल्याने ते बालंबाल बचावले. मात्र त्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने त्याच्या दुचाकीवर झडप घातली.

Web Title: Ajay Thakur's attack on the infamous house-escape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.