जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी अजय शहा, महासचिव राजन हौजवाला
By Admin | Updated: October 9, 2014 00:51 IST2014-10-09T00:32:44+5:302014-10-09T00:51:04+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्षपदी अजय शहा, तर महासचिवपदी राजन हौजवाला यांची एकमताने निवड करण्यात आली.

जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी अजय शहा, महासचिव राजन हौजवाला
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्षपदी अजय शहा, तर महासचिवपदी राजन हौजवाला यांची एकमताने निवड करण्यात आली.
महासंघाचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, भागचंद बिनायके, तनसुख झांबड, प्रफुल्ल मालाणी व आदेशपालसिंग छाबडा यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली. उर्वरित कार्यकारिणी याप्रमाणे- उपाध्यक्ष हरिसिंग, संजय कांकरिया, शैलेंद्र रावत, विजय जयस्वाल, कोषाध्यक्ष शिवशंकर स्वामी, सचिवपदी लक्ष्मीनारायण राठी व प्रवीण कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर माजी अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा यांनी अजय शहा यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली. जिल्ह्यातील लहान-मोठ्या सर्व व्यापाऱ्यांना महासंघाचे सदस्य करून घेण्यासाठी व्यापक अभियान राबविण्यात येणार आहे, यास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी शहा यांनी केले. विविध उपक्रम राबविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा राजन हौजवाला यांनी व्यक्त केली. यावेळी महासंघाचे पदाधिकारी व सर्व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी हजर होते.