अजूनही २२ रोहित्र धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 23:59 IST2017-07-27T23:59:50+5:302017-07-27T23:59:50+5:30
हिंगोली : शहरातील वीजपुरवठ्यासाठी हिंगोली शहरात महावितरणची एकूण २७६ रोहित्रे आहेत. यातील निम्म्या रोहित्रांना दरवाजेच नाहीत. महावितरणकडून नुकतेच दरवाजे नसलेल्या रोहित्रांचे सर्वेक्षण केले. त्यात जवळपास २२ रोहित्र अधिक धोकादायक असल्याचे समोर आले.

अजूनही २२ रोहित्र धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील वीजपुरवठ्यासाठी हिंगोली शहरात महावितरणची एकूण २७६ रोहित्रे आहेत. यातील निम्म्या रोहित्रांना दरवाजेच नाहीत. महावितरणकडून नुकतेच दरवाजे नसलेल्या रोहित्रांचे सर्वेक्षण केले. त्यात जवळपास २२ रोहित्र अधिक धोकादायक असल्याचे समोर आले.
हिंगोली शहरात महावितरणच्या रोहित्रांचे फ्यूज बॉक्स उघडे असल्याने अपघात होण्याची भीती आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. शहर परिसरात जवळपास २७६ विद्युत रोहित्र आहेत. सदर रोहित्रास तारकुंपन तसेच फ्यूज बॉक्सला दरवाजे नाहीत. अनेकदा विद्युत तारांचे घर्षण होऊन आग लागण्याच्या घटना घडतात. शहरातील शालेय परिसर तसेच विविध प्रभागांतील रोहित्रांची दयनीय अवस्था आहे. काही रोहित्रांमधून तर चक्क आॅईल गळती होते. यामुळे आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश रोहित्र व फ्यूज बॉक्स मुख्य रस्त्यांवरच असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महावितरणकडून किरकोळ दुरूस्ती केली की अवस्था ‘जैसे थे’ होते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो. अनेक फ्यूज बॉक्स उघड्यावर असल्याने रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक, शाळकरी मुले तसेच जनावरांना विजेचा धक्का लागण्याची दाट शक्यता आहे. महावितरण कंपनीने धोकादायक रोहित्र व फ्यूज बॉक्सची तत्काळ दुरूस्ती करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे शालेय परिसरातील उघड्या रोहित्राकडेही महाविरणने लक्ष देणे गरजे आहे. जेणेकरुन पुढील हानी टळेल.