शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा, वेरुळ लेणींना भरडधान्य, साळीचा साज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 07:23 IST

तेव्हा वापरलेल्या वनस्पती झाल्या लुप्त

लोकमत न्यूज नेटवर्क  छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा, वेरुळ लेणीत पेंटिंग, प्लास्टरसाठी येथीलच भरडधान्य, चंदन बटवा, साळी अशा विविध वनस्पतींचा वापर करण्यात आला. मात्र, काळाच्या ओघात जगप्रसिद्ध लेणी साकारण्यासाठी वापरलेल्या वनस्पती येथून लुप्त झाल्या. पर्यावरणात बदल झाला. वारसास्थळे जपण्यासाठी पूर्वीप्रमाणेच काम करावे लागेल, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे सेवानिवृत्त अधीक्षक पुरातत्वविद रसायनतज्ज्ञ डाॅ. मॅनेजर सिंह यांनी सांगितले.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातर्फे रविवारी बीबी का मकबरा परिसरात आयोजित कार्यक्रमात जागतिक वारसा सप्ताहाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. सिंह बोलत होते. अध्यक्षस्थानी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक डाॅ. वि. ल. धारूरकर होते

प्लास्टरमध्ये करण्यात आला भांगचा वापर   डाॅ. मॅनेजर सिंह म्हणाले, जगात पहिल्यांदा वेरुळच्या लेणीत प्लास्टरमध्ये भांगचा वापर झाला. यामुळे किड्यांपासून स्थळाचे संरक्षण होण्यास मदत झाली. चंदन बटवा, साळी (तांदूळ), कोदो (भरड धान्य) यांचाही लेणीत वापर झालेला आहे. म्हणजे या वनस्पती पूर्वी येथे होत्या.

२५ छायाचित्रांतून देशाची सफरnजागतिक वारसा सप्ताहानिमित्त बीबी का मकबरा येथे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. nयात देशभरातील २५ स्थळांची छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. २५ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादAurangabad caveऔरंगाबाद लेणी