आयसातर्फे घाटी रुग्णालयात २०० पीपीई किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:04 IST2021-05-19T04:04:46+5:302021-05-19T04:04:46+5:30

सध्या कोरोना रुग्णांची काळजी घेणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर (आयसा) ने सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांना पीपीई ...

AISA distributes 200 PPE kits to Ghati Hospital | आयसातर्फे घाटी रुग्णालयात २०० पीपीई किटचे वाटप

आयसातर्फे घाटी रुग्णालयात २०० पीपीई किटचे वाटप

सध्या कोरोना रुग्णांची काळजी घेणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर (आयसा) ने सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांना पीपीई किट वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. आयसाचे पदाधिकारी तथा उद्योजक जयराज पाटील यांनी घाटी रुग्णालयासाठी २०० पीपीई किट उपलब्ध करून दिले. मंगळवारी आमदार अतुल सावे, जयराज पाटील, अध्यक्ष मंगल पटेल, माजी अध्यक्ष विजय जयस्वाल, पंकज लोया आदींच्या उपस्थितीत घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्याकडे या पीपीई किट सुपूर्द करण्यात आल्या.

फोटो ओळ

औरंगाबाद इंडस्ट्रियल सप्लायर असोसिएशनतर्फे डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी २०० पीपीई किट अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्याकडे सुपूर्द करताना आमदार अतुल सावे, आयसाचे अध्यक्ष जयराज पाटील, मंगल पटेल, विजय जयस्वाल, पंकज लोया आदी.

Web Title: AISA distributes 200 PPE kits to Ghati Hospital