शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ प्राधिकरणातर्फे कमकुवत दृष्टीच्या प्रवाशांसाठी सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:25 IST

कमी दृष्टीच्या (अंधुक दिसणाऱ्या) प्रवाशांसाठी विमानतळ प्राधिकरणातर्फे विमानतळावर स्टेनलेस स्टीलच्या पट्ट्या आणि उंचवटे असलेल्या खिळ्यांच्या (स्टडस्) साहाय्याने विशिष्ट मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दृष्टी कमी असलेले प्रवासी त्यांच्या वाहनापासून विनासायास आणि सुरक्षितरीत्या विमानतळाच्या इमारतीमध्ये प्रवेश करून थेट विमानात प्रवेश करू शकतील.

औरंगाबाद : कमी दृष्टीच्या (अंधुक दिसणाऱ्या) प्रवाशांसाठी विमानतळ प्राधिकरणातर्फे विमानतळावर स्टेनलेस स्टीलच्या पट्ट्या आणि उंचवटे असलेल्या खिळ्यांच्या (स्टडस्) साहाय्याने विशिष्ट मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दृष्टी कमी असलेले प्रवासी त्यांच्या वाहनापासून विनासायास आणि सुरक्षितरीत्या विमानतळाच्या इमारतीमध्ये प्रवेश करून थेट विमानात प्रवेश करू शकतील.विमानतळ संचालक शरद येवले म्हणाले की, कमकुवत दृष्टीच्या हवाई प्रवाशांसाठी स्टेनलेस स्टीलच्या पट्ट्या व उंचवटे असलेला मार्ग सुरक्षित आहे. हा मार्ग एक फूट रुंद आणि २०० फूट लांब आहे. कमी दिसणारे प्रवासी त्यांच्या वाहनातून उतरल्यानंतर त्यांच्या डाव्या बाजूला हा विशेष मार्ग तयार केलेला आहे. त्यामुळे कोणाच्याही मदतीशिवाय असे प्रवासी या पट्ट्यांच्या मार्गावरून सुरक्षितरीत्या विमानतळाच्या इमारतीमध्ये प्रवेश करू शकतील. पुढे या मार्गावर वळण घेऊन हे प्रवासी विमानतळाच्या काऊंटरवर पोहोचू शकतील. पट्ट्या आणि उंचवट्याच्या मार्गामुळे प्रवासी चालताना घसरणार नाहीत. या सुविधेसाठी प्राधिकरणाला काही लाख रुपये खर्चावे लागले; परंतु पैशांपेक्षा प्रवाशांना पुरविण्यात आलेली सुविधा महत्त्वाची आणि आवश्यक असल्याचे, ते म्हणाले.अशा प्रकारच्या पट्ट्यांचे मार्ग मोठमोठे मॉल, रेल्वेस्थानक, मेट्रो स्टेशन, सबवे, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात असतात. विमानतळावर ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कमी दिसणाºया प्रवाशांना विमानतळात सुरक्षित आणि आत्मविश्वासाने प्रवेश करणे सुकर झाले आहे.पूर्वी अशा प्रवाशांसाठी ‘कन्व्हेयर बेल्ट’लगत विशिष्ट राखीव जागा होती. नवीन विमानतळ फेब्रुवारी २००९ पासून कार्यरत झाले. चिकलठाणा विमानतळाचा विकास आणि विस्तारीकरणासाठी माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी अजिंठा-वेरूळ विकास कार्यक्रमांतर्गत जपान बँक फॉर इंटरनॅशनल को-आॅपरेशन यांच्याकडून निधी उपलब्ध करून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.अशा प्रवाशांसाठी सोयीच्या स्वच्छतागृहाची सुविधा पूर्वीपासूनच विमानतळावर आहे. युरोपियन पद्धतीची ही स्वच्छतागृहे कमकुवत दृष्टीच्या प्रवाशांना सोयीची आणि सुखकर असावीत, अशाच पद्धतीने तयार करण्यात आली आहेत, अशा विशेष प्रवाशांना विमानतळ विशेष साहाय्य करते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAirportविमानतळ